Vladimir Putin : सध्या रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukrain) संबंध खूपच तणावाचे आहेत. दोन्ही देशांमध्ये जवळपास 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकी पत्रकार टकर कार्लसन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यानची खास मुलाखत घेतली आहे. कार्लसन यांच्याशी झालेल्या संभाषणात पुतिन यांनी अमेरिकेबाबत संताप व्यक्त केला. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अमेरिकेमुळेच होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ अमेरिकेच्या इशाऱ्यावर कीव्ह मॉस्कोपासून दूर झाला आहे.
युक्रेनच्या राजकारणात बदल घडवून आणल्याचा आरोप
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने 2014 मध्ये युक्रेनच्या राजकारणात बदल घडवून आणल्याचा आरोप पुतिन यांनी केला आहे. या काळात ज्यांनी नवे सरकार स्वीकारले नाही. त्या लोकांवर अनेक अत्याचार झाले. रशियन राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्यानुसार त्यांनी युद्धात तशी उडी घेतली नाही. युक्रेनमध्ये असलेल्या डॉनबास आणि क्रिमियाच्या लोकांनी रशियाला मदतीची विनंती केली तेव्हा तो पुढे आला.कार्लसन आणि पुतिन यांच्यातील ही बैठक सुमारे 2 तास चालली. यावेळी त्यांनी रशिया आणि युक्रेनचा इतिहासही सांगितला आणि युक्रेन कसे अस्तित्वात आले ते सांगितले.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध कशामुळे झाले? पुतिन यांनी सांगितले...
व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी ते म्हणाले की, अमेरिकेमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. पुतिन म्हणतात की 2008 मध्ये नाटोने युक्रेनशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, 2014 मध्ये सत्तापालट झाला होता. नाटोच्या आदेशानुसार, युक्रेनमधील ज्या लोकांनी नवीन सरकार स्वीकारले नाही त्यांना लक्ष्य करण्यात आले.
क्रिमियाचे लोक खूप अस्वस्थ होते आणि त्यांना असुरक्षित वाटत होते. त्यानंतर आम्हाला हस्तक्षेप करावा लागला. युक्रेनच्या सैन्याने 2014 मध्ये पहिल्यांदा डॉनबासच्या लोकांवर हल्ला केला होता. येथूनच सध्याचे युद्ध सुरू झाले.
युक्रेनमधील सत्तापालट सीआयएमुळेच झाला असे पुतीन यांचे म्हणणे आहे. आम्ही युक्रेनमध्ये सुरू असलेल्या समस्या अनेक वेळा अमेरिकेला सांगितल्या, पण आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
उलट युक्रेनने आपल्यावर लष्करी कारवाई सुरू केली. पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेशीही बोलायचे होते, परंतु तसे होऊ शकले नाही. इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या कराराचे दस्तावेजही त्यांनी उघड केले.
हेही वाचा>>>
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मागितली जनतेची माफी; नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले, So Sorry!