Virat Kohli AB devilliers : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) नव्हता. विराट वैयक्तिक अडचणी सांगत बीसीसीआयकडून सुट्टी मंजूर करुन घेतली होती. दरम्यान, विराटचा जिगरी मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्स(AB devilliers) याने विराट आणि अनुष्का (Anushka Sharma) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर विराट-अनुष्काबाबत जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान, डिविलियर्स आपले विधान मागे घेत माफीनामा जाहिर केला आहे. शिवाय, विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे विधानही त्याने मागे घेतले आहे. 


विराटबाबतच्या माहितीवरुन डिविलियर्सने मागितली माफी 


भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत केलेल्या विधानावर माफी मागत डिविलियर्सने स्पष्टीकरण दिले आहे. माझ्याकडून चुकीची माहिती दिली गेली. ही माझ्याकडून सर्वांत मोठी चूक झाली. क्रिकेटनंतर सर्व खेळाडूंसाठी कुटुंब महत्वाचे असते. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी विराटबाबत दिलेली माहिती चुकीची होती. विराट कोहलीला देशासाठी खेळत असताना ब्रेक घेण्याचा अधिकार आहे. कुटुंब महत्वाचे असते, त्यानंतर क्रिकेट. विराट कोहली कौटुंबिक अडचणींमुळे संघाबाहेर आहे. तो सध्या कोठे आहे? हे कोणालाही माहिती नाही. जगभरातील विराट चाहत्यांनी त्याला चांगल्या शुभेच्छा द्याव्यात. विराट पुन्हा त्याच ताकदीने मैदानात उतरेल, यासाठी मी प्रार्थना करतो.  


इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून कोहलीची माघार 


भारत सध्या इंग्लंडविरोधात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांत विराट भारतीय संघासाठी उपलब्ध नव्हता. विराटने बीसीसीआयकडे कौटुंबिक कारणांचा पाढा वाचला होता. त्यामुळे त्याला सुट्टी मंजूर करण्यात आली होती. 22 जानेवारीला विराट टीम इंडियासोबत होता. मात्र, त्यानंतर त्याने सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला. शिवाय मालिकेतील उर्वरित 3 सामन्यांसाठी विराट उपलब्ध असणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.  


काय म्हणाला होता डिविलियर्स?


दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिविलियर्स याने दोन दिवसांपूर्वी युट्यूब चॅनेलवरुन विराटबाबत भाष्य केले होते. विराट आणि अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे एबी डिविलियर्स म्हणाला होता. शिवाय, त्याने विराट बरोबर मेसेजद्वारे झालेल्या चर्चेचाही हवाला दिला होता. डिविलियर्स म्हणाला होता, विराटचा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. यावेळी कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे. ही वेळ महत्वपूर्ण असते. मला वाटते की, अनेक लोकांची प्राथमिकता त्यांचे कुटुंब असते. त्यामुळे विराटच्या निर्णयाबाबत त्याला कोणीही जज करु नये, असे मत डिविलियर्सने विराटबाबत व्यक्त केले होते. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Aboli Marathi News : मनवाने दिलं अबोलीला खुलं आव्हान, नणंद-भावजयच्या खेळात कोण मारणार बाजी?