एक्स्प्लोर

Drishyam 3: 1 ट्विस्ट अन् स्टोरीला रंजक वळण, सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर सुस्साट, किती कोटी कमावले?

Mohanlals Drishyam 3: 'दृश्यम 3' सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद. आठव्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला?

Drishyam 3 Box Office Collection Day 8: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) सध्या सस्पेन्स थ्रिलर 'दृश्यम 3' (Drishyam 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे.  'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्ही सिनेमांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'दृश्यम 3' (Entertainment) पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केलीये.  मोहनलाल यांनी पुन्हा एकदा दमदार अभिनय आणि रंजक कथेतून  प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.   21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम 3' या सिनेमाने पहिल्याच दिवशी आपली बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पकड मजबूत केली आहे. निरंतर 7 दिवस या सिनेमाने जबरदस्त घौडदौड केली आहे. दरम्यान, 8व्या दिवशी या सिनेमाने किती कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले? जाणून घेऊयात.

'दृश्यम 3' या सिनेमानं 8व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Drishyam 3 Worldwide Box Office Collection)

मोहनलाल अभिनीत आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'दृश्यम 3' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली. 15.85 कोटींचे कलेक्शन करुन या सिनेमानं आपले बॉक्स ऑफिसवर खाते खोलले.  ओपनिंग विकेंडलाही या सिनेमानं कमालीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohanlal (@mohanlal)

दरम्यान, वीकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत बरेच चढ - उतार पाहायला मिळाले. तरीही पहिल्या आठवड्यात या सिनेमानं 75.30 कोटींचे जबरदस्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  8 व्या दिवशीही 'दृश्यम 3' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू चालली.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 3'  या सिनेमानं प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 6.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  म्हणजेच  या सिनेमाचे 8 दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 81.80 कोटी इतके आहे. 

विदेशातही 'दृश्यम 3'चा डंका (Drishyam 3 Overseas Box Office Collection)

क्राइम थ्रिलर 'दृश्यम 3'  या सिनेमानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी केली आहे. परदेशात या सिनेमानं आठव्या दिवशी 5.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  8 दिवसांत या सिनेमानं एकूण 103.00 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. आतापर्यंत या सिनेमानं वर्ल्डवाइड 197.91 कोटींची कमाई केली आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

ABP माझाच्या बातम्या LIVE..

 

महत्त्वाच्या बातम्या

चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
चार भिंतीच्या आत राहणाऱ्यांना नानांचं काम खूपत होतं का? बॉलीवूडच्या लोकांनी मराठी माणसाचा तिरस्कार करणं बंद करावं, अमोल मिटकरींचा संताप
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Vijay Deverakonda : अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
अभिनेता विजय देवरकोंडा बनला 'रामराज कॉटन'चा ब्रँड ॲम्बेसेडर; खास वेडिंग कलेक्शनचा चेहरा
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget