एक्स्प्लोर

मुंबई हादरवणाऱ्या स्फोटांनंतरचं गूढ पुन्हा जिवंत; ‘मिशन मुंबई’तून उलगडणार थरार, कधी होणार रिलीज?

साखळी बॉम्बस्फोटाच्यावेळी ३०० किलो आरडीएक्स पैकी १०० किलो आरडीएक्स वापरलं, २०० किलो आरडीएक्स गेलं कुठे?, 'मुंबई मिशन'मधून उलगडणार मोठं सत्य

Marathi Movie: मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसांनंतरची थरारक सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणारा एक नवाकोरा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. आरडीएक्सचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेली जीवघेणी मोहीम आणि त्यामागचा संघर्ष या पोस्टरमधून प्रकर्षाने दिसून येत आहे.

पोस्टरमध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील कलाकाराचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत असून चित्रपटातील ॲक्शन आणि गांभीर्याची साक्ष देत आहे. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी 300 किलो आरडीएक्स पैकी 100 किलो आरडीएक्स वापरलं गेलं, तर 200 किलो आरडीएक्स गेलं कुठे?, याचा शोध 'मुंबई मिशन'मधून उलगडणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन हा काल्पनिक सिनेमा बनविण्यात आला आहे.

कधी होणार रिलीज?

'रेविकांता फिल्म्स निर्मित' आणि 'आकात डिस्ट्रिब्युशन' प्रस्तुत, बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'मिशन मुंबई' चे अधिकृत पोस्टर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यावेळच्या भीषण आरडीएक्स (RDX) शोध मोहिमेवर प्रेरित असलेलं हे थरारनाट्य येत्या १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अभिनेते अजॉय शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. 

काय आहे स्टारकास्ट?

'मिशन मुंबई'  या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माती सौ. कांता शर्मा यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. 'आकात डिस्ट्रिब्युशन' प्रस्तुत हा चित्रपट आहे. तर चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी लेखक चंद्रकांत विसपुते यांनी सांभाळली आहे.  तसेच संगीत समीर खोले, मंदार कीर, रवींद्र खरात, विकी वाघ यांचे आहे. तर चित्रपटातील गाण्यांना गायक सुदेश भोसले, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी साईराम, विकी वाघ, दिशा सुतार यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर गीतकार म्हणून कृपेश, विकी, राजीव, बिपीन यांनी बाजू हाताळली. तसेच कार्यकारी निर्माता म्हणून बाबासाहेब पाटील यांनी बाजू पाहिली आहे. 

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक चंद्रकांत विसपुते म्हणाले की, "मुंबईच्या इतिहासातील तो काळ आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. सत्य घटनेवर प्रेरित होऊन 'मिशन मुंबई' च्या माध्यमातून आम्ही त्या शोध मोहिमेतील धाडस आणि पोलीस दलाचे योगदान काल्पनिकदृष्ट्या पडद्यावर मांडत आहोत. १५ मे रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होईल".

महत्त्वाच्या बातम्या

Trending CJP Protest Song: जंतर-मंतर आंदोलन संपलं, पण 8 वर्षांपूर्वीचं हे गाणं ठरलं आंदोलनाचा आवाज; सोशल मीडियावर अजूनही होतंय ट्रेंड
जंतर-मंतर आंदोलन संपलं, पण 8 वर्षांपूर्वीचं हे गाणं ठरलं आंदोलनाचा आवाज; सोशल मीडियावर अजूनही होतंय ट्रेंड
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Kushal Badrike On Pravin Tarde: 'प्रवीण तरडेने मला सणसणीत कानफाडात मारलीय ' कुशल बद्रिकेनं सांगितला शूटिंगमधील किस्सा, म्हणाला..
'प्रवीण तरडेने मला सणसणीत कानफाडात मारलीय ' कुशल बद्रिकेनं सांगितला शूटिंगमधील किस्सा, म्हणाला..
Bhetali Tu Punha Sequel: 'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?
'भेटली तू पुन्हा' लव स्टोरीच्या पुढची स्टोरी; वैभव तत्ववादी, पूजा सावंत पुन्हा एकत्र, कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget