एक्स्प्लोर

Mirzapur 2 : 'मिर्झापूर'ची गादी कोणाची? चाहत्यांची प्रतिक्षा संपली; आज लॉन्च होणार ट्रेलर

कालीन भैय्या यांचं वर्चस्व असणाऱ्या मिर्झापुरचं चित्र 'मिर्झापूर 2'मध्ये कसं असणार? हे पाहण्यासाठी चाहते गेले अनेक दिवस वाट पाहत आहेत. पण आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. आज सर्वात लोकप्रिय मिर्झापूर सीरीजचा पुढचा पार्ट 'मिर्झापूर 2'चा ट्रेलर रिलीज होणार आहे.

मुंबई : 'बाहुबली' चित्रपटानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, 'कटप्पा ने बाहूबली को क्यों मारा?' या प्रश्नाचं उत्तर 'बाहुबली 2'मध्ये सर्वच चाहत्यांना मिळालं होतं. पण त्यानंतर एकाच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सर्वांची धडपड सुरु आहे, ते म्हणजे, 'मिर्झापूर 2'मध्ये काय पाहायला मिळणार आहे. कालीन भैय्या यांचं वर्चस्व असणाऱ्या मिर्झापुरचं चित्र 'मिर्झापूर 2'मध्ये कसं असणार? हे पाहण्यासाठी चाहते गेले अनेक दिवस वाट पाहत आहेत. पण आता चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. आज सर्वात लोकप्रिय मिर्झापूर सीरीजचा पुढचा पार्ट 'मिर्झापूर 2'चा ट्रेलर रिलीज होणार आहे. 'मिर्झापूर 2' मध्ये गुड्डू पंडित, कालीन भैय्या आणि मुन्ना भैय्या यांच्यावर भारी पडणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर दुपारी एक वाजता 'मिर्झापूर 2'चा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.

वेब सीरीज मिर्झापूरचा सीझन 2 मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी कालीन भैय्या, अली फजल गुड्डू, दिव्येंदु शर्मा मुन्ना भैय्या या भूमिकेत दिसणार आहे. याव्यितिरक्त श्वेता त्रिपाठी गोलूची भूमिका साकारणार आहे. उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते.

उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.

मिर्झापूरमध्ये कालीन भैय्याच्या भूमिकेत दिसलेले पंकज त्रिपाठी यांनी सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'नोट कर लें कल 1 बजे ट्रेलर का प्रबंध कर रहे हैं.'

दरम्यान, मिर्झापूर सीझन 2 केव्हा येणार? हा प्रश्न गेले अनेक दिवस चाहत्यांच्या मनात घर करून होता. परंतु, काही दिवसांपूर्वी 23 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मिर्झापूर उत्तर प्रेदशातील मिर्झापूरवर आधारित आहे. वेब सीरिजमधील प्रत्येक एपिसोड रोमांचक होता. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mirzapur 2 | प्रतिक्षा संपली, 'मिर्झापूर 2' या दिवशी होणार रिलीज!

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Aamir Khan Raj Thackeray Imran Khan: भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?
भाच्याला देश सोडण्याची नोटीस, आमिर खान राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर; कारण काय, इम्रान खान की आणखी काही?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
Embed widget