नवी दिल्ली : मोस्ट अवेटेड वेब सीरीज मिर्झापूर 2 चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर एकीकडे अनेक चाहते ट्रेलरचं कौतुक करत असून दुसरा सीझन पाहण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे काही लोक मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनवर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. यामागील कारण म्हणजे, या वेब सीरिजमधील लीड अॅक्टर अली फजल आणि को-प्रोड्यूसर फरहान अख्तर हे आहेत. ट्विटरवर लोक अली फजलच्या मागच्या पोस्टबाबत नाराज आहेत. डिसेंबर 2019मध्ये त्यांनी सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्यांना विरोध केला
होता.
युजर्सनी ट्विटरवर अली फजल म्हणजेच मिर्झापूरमधील गुड्डूच्या डायलॉगचा आधार घेतला आहे. तर अनेक युजर्सनी लिहिलं आहे की, "शुरू मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है!" तसेच फरहान अख्तरचा विरोध सीएए विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे करण्यात येत आहे.
फ्रीमध्येही पाहणार नाही मिर्झापूर 2
एका युजरने मिर्झापूरचं एक पोस्टर शेअर करत लिहिलं आहे की, 'देशाप्रती बेईमान असणाऱ्या लोकांच्या वेब सीरीज किंवा चित्रपट पाहिले नाही पाहिजे.' तसेच यासोबत बायकॉट मिर्जापुर 2 चा हॅशटॅग दिला आहे. तसेच आणखी एका युजरने लिहिलं आहे की, 'मी मिर्झापूर फ्रीमध्येही पाहणार नाही.'
नेटकऱ्यांची 'बायकॉट मिर्झापूर 2' मोहीम
दुसऱ्या सीझनमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री
उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा अॅक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.
पाहा ट्रेलर :
एकापेक्षा एक डायलॉग्सची चाहत्यांसाठी मेजवानी
पहिल्या सीझनच्या शेवटी मुन्ना भैय्या बबलु पंडीत आणि गुड्डू पंडीतच्या बायकोला गोळ्या घालून ठार करतो. त्याचाच बदला या सीझनमध्ये गुड्डू पंडीत घेणार आहे. तसेच त्याच्यासोबत श्वेताही बंदूकीसोबत खेळताना दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये 'अब हमको बदला लेना है, और मिर्झापूर भी.', 'इस मिट्टी का उधार है हम पर, चुकाना है' आणि 'आप चाहते थे कि आपकी बेटी मिर्जापुर पर राज करे, बड़ी ना सही छोटी बेटी राज करेगी' अशा एकापेक्षा एक डायलॉग्सची चाहत्यांसाठी मेजवानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :