मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी झाली. यामध्ये सारा अली खानचाही समावेश आहे. एनसीबीच्या समन्सनंतर सारा अली खान गोव्याहून मुंबईला आली होती. आपण ड्रग्जचं सेवन केलं नाही असा दावा साराने चौकशीदरम्यान केला. एनसीबीने साराची चौकशी केल्यानंतर या प्रकरणापासून अंतर ठेवण्यासाठी सैफ अली खान पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसह दिल्लीला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र यावर आता सैफने प्रतिक्रिया दिली आहे.


एका वेबसाईटशी बोलताना सैफ म्हणाला की, "मी माझ्या तिन्ही मुलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या पाठिशी कायम असेन." हे खरं आहे की मी जास्त वेळ तैमूरसोबत व्यतीत करतो. पण सारा आणि इब्राहिम यांच्याही कायम संपर्कात असतो. तिन्ही मुलांसाठी माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे.


ड्रग्ज कनेक्शनमध्ये साराची चौकशी झाल्याच्या मुद्द्यावर सैफ अली खान म्हणाला की, जर मी सारावर एखाद्या गोष्टीवरुन नाराज असेन तर यात दिलासा देण्यासाठी तैमूर काही करु शकत नाही. माझी तिन्ही मुलं वेगवेगळ्या वयाची आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्शनची गरज आहे. मी फोन किंवा चॅटवर सारा आणि इब्राहिमशी बोलू शकतो. पण हे मी तैमूरसोबत करु शकत नाही. त्यासाठी मी तैमूरला जास्त वेळ देत आहे.


ड्रग कनेक्शन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीतची चौकशी केली होती. चौकशीत साराने सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, असं सांगितलं होतं. त्यावेळी आपण त्याच्या फार्महाऊसवर जायचो, असंही म्हटलं होतं. मात्र ड्रग्जचं कधीही सेवन केलं नाही, असा दावाही तिने केला आहे.


...म्हणून सैफ अली खान दिल्लीत गेला!
सैफ अली खान चौथ्यांदा बाबा बनणार आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान लवकर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. करीना आणि सैफ तैमूरसह सध्या दिल्लीत आहे. करीना प्रेग्नन्सीदरम्यानही आमीर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाचं दिल्लीतील चित्रीकरण 45 दिवसांचं आहे.


Bollywood drug probe | सुशांतशी कसा संबंध आला? सारा काय म्हणाली...