Meenakshi Seshadri : घायल (Ghayal), दामिनी (Damini) यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमधील अभिनयानं अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रिने (Meenakshi Seshadri)प्रेक्षकांची मनं जिंकली. 90 च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रीनं सध्या चित्रपट क्षेत्रामधून ब्रेक घेतला आहे. मीनक्षी ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह आहे. नुकताच मीनक्षीनं तिच्या नव्या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तिचा हा नवा लूक पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
मीनाक्षीनं तिचा नो मेकअप लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'न्यू लूक'. चष्मा आणि शॉर्ट हेअर अशा लूकमध्ये मीनाक्षी दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोला कमेंट केल्या आहेत. एका चहात्यानं कमेंट केली, 'तुझी अवस्था अशी कशी झाली?' तर 'कोण होतीस तू, काय झालीस तू..' असा प्रश्न मीनाक्षीचा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना पडला आहे.
मीनाक्षीचा चाहता वर्ग मोठा आहे. तिनं 1995 मध्ये हरीश मैसूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर हरीश आणि मीनाक्षी हे अमेरिकेला गेले. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ती डान्स क्लास घेते. मीनाक्षी ही 58 वर्षाची आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो मीनाक्षी सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या
- Dadasaheb Falke International Film Festival Awards : 'शेरशाह' बेस्ट फिल्म तर रणवीर बेस्ट अॅक्टर; पाहा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची यादी
- Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव
- Hrithik Roshan ह्रतिकच्या फॅमिली फोटोमधील नव्या पाहुण्याची चर्चा ; व्हायरल फोटोमुळे रंगल्या चर्चा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha