Dadasaheb Falke International Film Festival Awards :  दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार (Dadasaheb Falke International Film Festival Awards)  सोहळ्याचे रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईमध्ये आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला  आशा पारेख (Asha Parekh), लारा दत्ता (Lara Dutta), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra), कियारा आडवाणी (Kiara Advani),अहान शेट्टी (Ahan Shetty) , सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी हजेरी लावली होती. चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  तसेच अभिनेत्री क्रिती सेननला मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता रणवीर सिंहला देखील  83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार विजेत्यांची यादी -सर्वोत्कृष्ट चित्रपट- शेरशाह

सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणवीर सिंहसर्वोत्कृष्ट  अभिनेत्री- कृति सेननसर्वोत्कृष्ट पदार्पण- अहान शेट्टीफिल्म ऑफ द इयर- पुष्पा द राइजसर्वोत्कृष्ट वेब सीरीज- कँडीसर्वोत्कृष्ट अभिनेता (वेब सीरीज)- मनोज बाजपेयीसर्वोत्कृष्ट  अभिनेत्री (वेब सीरीज)- रवीना टंडनसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- विशाल मिश्रासर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूरसर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म- पाउलीबेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म- अनादर राउंडसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- केन घोषसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- जयाकृष्ण गुममड़ीसर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेता- सतीश कौशिकसर्वोत्कृष्ट  सहाय्यक अभिनेत्री- लारा दत्तासर्वोत्कृष्ट खलनायक- आयुष शर्मापीपल्स चॉइस  सर्वोत्कृष्ट अभिनेता- अभिमन्यु दासानीपीपल्स च्वाइस सर्वोत्कृष्ट  अभिनेत्री- राधिका मदानटेलिविजन सीरियल ऑफ द इयर- अनुपमासर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- शाहीर शेखसर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- श्रद्धा आर्यामोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर टिव्ही  सीरियल- धीरज धूपरमोस्ट प्रॉमिसिंग अॅक्ट्रेस टिव्ही सीरियल- रुपाली गांगुलीक्रिटिक बेस्ट फिल्म- सरदार उधमक्रिटिक बेस्ट अॅक्टर- सिद्धार्थ मल्होत्राक्रिटिक बेस्ट अॅक्ट्रेस- कियारा आडवाणी

संबंधित बातम्या

Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..

Sai Pallavi : 'कोट्यवधींचं मानधन असणारी जाहिरात नाकारली' ; चेहऱ्यावरील पिंपल्सबाबत साई पल्लवीनं सांगितला अनुभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha