Sai Pallavi : दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नॅचरल ब्यूटीमुळे साईला विशेष लोकप्रियता मिळाली. एका फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीसाठी साईला दोन कोटी रूपयांचे मानधन मिळणार होते परंतू त्या जाहिरातीमध्ये तिनं काम करण्यास नकार दिला. या गोष्टीबद्दल साईनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्वचेमुळे साईनं आत्मविश्वास गमावला होता असं तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 


साईला असे वाटतं होते की लोक फक्त तिच्या चेहऱ्यावरील पिंपल्सला मोठ्या पडद्यावर पाहतील. ती नेहमी या गोष्टीचा विचार करत होती. पण तिच्या चाहत्यांनी तिच्या त्वचेपेक्षा तिच्या अभिनयाकडे विशेष लक्ष दिलं. साईनं मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला घरातून बाहेर जायची भिती वाटतं होती. मी घरातच राहात होते. मी दिवसभर याच गोष्टीचा विचार करत होते की लोक माझ्या चेहऱ्यावरील पिंपल्स पाहतील आणि या गोष्टीची चर्चा करतील. मला या गोष्टीचा सीरियस प्रोब्लेम आहे. '



फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीची ऑफर नाकारण्याबाबत साई पल्लवीनं सांगितलं,'अनेकांना माहित आहे की ही जाहिरात मी का नाकारली. मला माझ्या त्वचेवरील पिंपल्समुळे इनसिक्योर फिल झालं होतं. पण अनेकांनी माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं. लोकांनी माझ्या पिंपल्स असलेल्या चेहऱ्याला स्वीकारलं.'






संबंधित बातम्या


Rajkummar Rao-Patralekhaa : राजकुमार रावकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत म्हणाला..


Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे 'या' अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर


Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर साधला निशाणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha