एक्स्प्लोर

Mardini Upcoming Movie: 'आई तारी तिला कोण मारी'; 'मर्दिनी'च्या पोस्टरमधून उलगडला मातृत्वाचा शक्तिशाली प्रवास

Mardini Upcoming Movie: पोस्टरमधून समोर आलेली पहिली झलक आणि त्यावरील आशयपूर्ण कॅप्शनमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे.

Mardini Upcoming Movie: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Entertainment World) आशयप्रधान आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे. अशाच प्रभावी कथानकासह आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे 'मर्दिनी' (Mardini) हा नवा मराठी चित्रपट. चित्रपटाच्या पोस्टर (Mardini Movie Poster) लॉन्चचे अनावरण करण्यात आले असून, या निमित्ताने चित्रपटाची  अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमधून समोर आलेली पहिली झलक आणि त्यावरील आशयपूर्ण कॅप्शनमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची कथा मांडणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित 'मर्दिनी' हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी कथा असल्याचे समोर येत आहे. पोस्टरवरील "आई तारी तिला कोण मारी" म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही... हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं. आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. 

चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर 'मर्दिनी'सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावीपणा मिळणार असून, बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेत भावनिक पैलू जोडणारी ठरणार आहे. कलाकारांची निवड आणि विषयाची ताकद यामुळे 'मर्दिनी'बद्दलची उत्सुकता अधिक वाढत आहे.

अजय मयेकर दिग्दर्शित 'मर्दिनी' हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली हा चित्रपट साकारला जात आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी, छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला भक्कम आधार दिला आहे.

पोस्टर लॉन्चच्या अनावरणातून 'मर्दिनी'च्या प्रवासाची पहिली झलकमुळे या चित्रपटाबद्दलची चर्चा चित्रपटवर्तुळात रंगू लागली आहे. आईच्या प्रेम, संरक्षण आणि संघर्षाच्या भावनिक कथेला मध्यवर्ती ठेवणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget