एक्स्प्लोर

Patrapatri: शब्द, आठवणी आणि मैत्रीचा शंभरावा सोहळा; ‘पत्रापत्री’च्या साभिनय अभिवाचनाचा शतकमहोत्सवी प्रयोग

Patrapatri Completes 100 Successful Shows: दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनातून हा प्रयोग साकारण्यात आला आहे.

Dilip Prabhavalkars Patrapatri: मराठी सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पत्रापत्री’ (Patrapatri) या आगळ्यावेगळ्या साभिनय अभिवाचनाने आता 100व्या प्रयोगाचा (Entertainment) मानाचा टप्पा गाठला आहे. शब्दांची ताकद, भावनांची उब, दृकश्राव्य सादरीकरणाची देखणी साथ आणि दोन ज्येष्ठ कलावंतांची अप्रतिम जुगलबंदी यामुळे ‘पत्रापत्री’ने रसिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.

दोन मित्रांमधील पत्रसंवाद (Patrapatri 100th performance celebration in Marathi theatre)

ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या पत्रांच्या विश्वाला विजय केंकरे यांच्या कल्पक सादरीकरणाची जोड लाभली आणि त्यातून साकारला हा अनोखा प्रयोग. हे केवळ अभिवाचन नाही, तर शब्द, भावना आणि अभिनय यांचा सुरेख संगम असलेले साभिनय अभिवाचन आहे. दोन मित्रांमधील पत्रसंवादाच्या माध्यमातून उलगडणाऱ्या आठवणी, नात्यांतील जिव्हाळा, काळानुसार बदलणारे संदर्भ आणि मिश्किल विनोद यामुळे प्रत्येक प्रयोग रसिकांसाठी एक आत्मीय अनुभव ठरला आहे.

बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित पत्रापत्रीमध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगात काही नवी पत्रे आणि नवे संदर्भ समाविष्ट केले जातात. त्यामुळे ‘पत्रापत्री’चा प्रत्येक प्रयोग हा तितकाच ताजा, जिवंत आणि समकालीन वाटतो. आजच्या सोशल मीडिया आणि झटपट संवादांच्या युगात पत्रांमधील भावना, शब्दांमधील ऊब आणि संवादातील प्रामाणिकपणा यांची आठवण करून देण्याचे महत्त्वाचे काम या प्रयोगाने केले आहे.

या शतकमहोत्सवी प्रयोगानिमित्त बोलताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, "पत्रापत्री'चा शंभरीपर्यंतचा प्रवास हा आमचा नसून रसिकांचा आहे. दोन इरसाल मित्रांच्या पत्रांमधून रंगणारी ही टिंगलटवाळी, हा मिश्किल संवाद आणि या साभिनय अभिवाचनाची वेगळी शैली प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली. या प्रयोगातील विनोद हा केवळ हसवण्यासाठी नाही, तर नात्यांमधला जिव्हाळा जपण्यासाठी आहे. म्हणूनच 100 प्रयोगांचा हा टप्पा आमच्यासाठी विशेष आहे. अजूनही या दोन मित्रांच्या गप्पा ऐकायच्या असतील, तर आम्ही तुमची वाट पाहत आहोत

‘पत्रापत्री’चा 100वा प्रयोग हा केवळ एका यशस्वी कलाकृतीचा टप्पा नसून शब्दांवरच्या विश्वासाचा, मैत्रीच्या नात्याचा आणि संवादाच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. शंभर प्रयोगांचा हा प्रवास पूर्ण करताना ‘पत्रापत्री’ने असंख्य रसिकांच्या मनात आठवणींची, भावनांची आणि माणुसकीची नवी पाने लिहिली आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget