एक्स्प्लोर

Priya Bapat: वयाचं अंतर अन् त्यात लव्ह मॅरेज, लग्नाच्या आदल्या दिवशी आईने प्रिया बापटला दिला मोलाचा सल्ला

Priya Bapat Mother Advice: लग्नाच्या आदल्या दिवशी प्रियाच्या आईने तिला खंबीर पाठिंबा देणारा मोलाचा सल्ला दिला.

Priya Bapat: मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी प्रिया बापट (Priya Bapat) विविध कारणांमुळे चर्चेत असते. प्रोफेशनलसह अभिनेत्री पर्सनल (Entertanment) कारणांमुळेही चर्चेत असते. प्रिया आणि उमेश कामत (Umesh Kamat) ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रिया  आणि उमेश यांच्यात 9 वर्षांचं अंतर आहे. उमेश हा प्रियाहून 9 वर्षे मोठा आहे. दोघांचं तसं लव्ह मॅरेज. वयातील अंतर आणि दोघांचं लव्ह मॅरेज असल्यामुळे दोघांच्या घरातील सदस्यांना त्यांची काळजी वाटत होती. प्रियाने या लग्नासाठी आपल्या कुटुंबाला मनवलं होतं. दरम्यान, अभिनेत्रीच्या आईनं लव्ह मॅरेज करताना मोलाचा सल्ला दिला होता. 

मराठी सिनेसृष्टीतील हे क्यूट कपल प्रेक्षकांना कपल गोल्स देतात.  सुखी संसारातील मंत्र दोघेही शेअर करत असतात.  अलिकडेच प्रियाने मुलाखतीत, तिच्या आईने दिलेला मोलाचा सल्ला शेअर केला. 

प्रिया बापटला आईकडून मोलाचा सल्ला (Priya Bapat mother advice before love marriage)

लग्न ठरल्यानंतर आणि लग्न करण्यापूर्वी लेकीच्या घरातील सदस्यांना मुलीची काळजी असते.  आपल्या लेकीला सासरी चांगली वागणूक मिळणार की नाही, अशी चिंता असते.  कारण घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी मुलींचा छळ होणे, या बातम्या कानावर येत असतात. जर लव्ह मॅरेज झालं असेल तर, काही महिलांकरिता माहेरचे दरवाजे बंद होतात.  मात्र, प्रिया बापटच्या आईंचा विचार समाजाच्या पलिकडे होते. त्यांनी  समाजाची मानसिकता मोडीत काढत लेक प्रियाला मोलाचा सल्ला दिला होता. तो सल्ला नेमका काय होता, हे अभिनेत्रीनं मुलाखतीत शेअर केला आहे. 

मुलीच्या सुरक्षिततेसाठी प्रिया बापटच्या आईने तिला खंबीर पाठिंबा दिला होता. प्रिया बापटने लग्नाच्या आदल्या दिवसाचा किस्सा शेअर केला. म्हणाली, 'लव्ह मॅरेज करताना कायम लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याचा विचार केला जातो.   होऊ नये पण पुढे काही चुकीचं झालं तर, ही भीती मनात असते.  लग्नाच्या एक दिवस आधी आई  माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की, मला माहित आहे तू लव्ह मॅरेज करत आहे. पण उद्या जर काही कमी जास्त झालं, काही चुकीचं घडलं, तर अजिबात घाबरू नकोस. तू पुन्हा माझ्याकडे परत येऊ शकतेस'.

प्रिया आणि उमेश या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.    त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.  संसाराला इतके वर्षे होऊनही त्यांनी आपल्या नात्यातील नाविन्य कायम जपले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राम चरण अन् जान्हवीची हिट ठरली जोडी; 3 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई, 150 कोटींच्या दिशेनं वाटचाल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Embed widget