एक्स्प्लोर

Marathi Movie Suraj Chavan : 'राजाराणी' चित्रपटाचे लालबागच्या राजाच्या चरणी पोस्टर लाँच; गुलिगत सूरज चव्हाणचीदेखील प्रमुख भूमिका

Marathi Movie Suraj Chavan : महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारीत राजाराणी चित्रपटाचे पोस्टर 'लालबागच्या राजा'च्या चरणी लाँच करण्यात आले.

Marathi Movie Suraj Chavan : सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक नावाजलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पााच्या दर्शनाला भाविकांची रांग लागत आहे. मुंबईतील 'लालबागच्या राजा'च्या दर्शनाला भाविकांची मोठी रांग लागत आहे. काही चित्रपटांचे पोस्टरही बाप्पााच्या साक्षीने लाँच करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सत्यघटनेवर आधारीत राजाराणी चित्रपटाचे पोस्टर 'लालबागच्या राजा'च्या चरणी लाँच करण्यात आले. या चित्रपटात बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा सीझन गाजवणारा स्पर्धक सूरज चव्हाणदेखील (Suraj Chavan)  महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या "राजाराणी" चित्रपटाचे पोस्टर  "राजाराणी" चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , प्रमुख अभिनेता रोहन पाटील , सह निर्माते कार्तिक दोलताडे व टीम यांनी लालबागच्या राजाच दर्शन घेऊन पोस्टर प्रदर्शित केले. हा चित्रपटाची कथा ही ग्रामीण भागातील सत्य घटनेवर आधारीत आहे. नव्या दमाच्या आणि अनुभवी कलाकारांचं मिश्रण या चित्रपटात आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच एकत्र या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. राजाराणीच्या माध्यमातून सूरज चव्हाण ही आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सूरजची भूमिका असलेला 'राजाराणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात सूरजची भूमिका काय?

''राजाराणी'' या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील प्रेमप्रकरणावर आहे. सूरज  चव्हाण या चित्रपटातील नायक असलेल्या रोहन पाटीलच्या मित्राच्या भूमिकेत आहे. कठीण काळात मदत करणारा, मित्रावरील संकट आपले समजणारा, मित्र किती प्रामाणिक असावा, असे दर्शवणारी भूमिका या चित्रपटात सूरज साकारणार आहे.

चित्रपटात कोणते कलाकार?

रोहन पाटील , वैष्णवी शिंदे , तानाजी गळगुंडे , भारत गणेशपुरे , सुरेश विश्वकर्मा , भक्ती चव्हाण , माधवी जुवेकर आणि  सूरज चव्हाण देखील महत्वाचा भूमिकेत दिसणार आहे. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. पी. शंकरम यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर यांनी आवाज दिला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget