एक्स्प्लोर

हिंदी प्रोडक्शन हाऊसकडून नटरंग अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव; विभावरीने सगळंच सांगितलं? पोस्ट शेअर

Vibhavari Deshpande shares shocking Bollywood experience: विभावरी देशपांडेंचा धक्कादायक बॉलीवूड अनुभव उघड. पोस्ट शेअर करून दिली माहिती.

Vibhavari Deshpande shares shocking Bollywood experience: उल्लेखनीय कामगिरीतून मराठी अभिनेत्री विभावरी देशपांडे घराघरात पोहोचली. ती सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. विभावरीनं आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  अलिकडेच तिची हिंदी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, तिच्या नकळत हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. तिनं हा धक्कादायक अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

विभावरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "गेल्या वर्षी एका हिंदी प्रोजेक्टसाठी  माझी निवड करण्यात आली होती. हा हिंदी प्रोजेक्ट एका नावाजलेल्या दिग्दर्शकाचा होता. ऑडिशनशिवाय मला रोल ऑफर करण्यात आला होता.  याविषयी माझं दिग्दर्शकासोबत बोलणंही झालं. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार अशी माहिती मला मिळाली.  पुढची चर्चा करण्यासाठी प्रोडक्शन हाऊसमधून फोन येईल, असं मला सांगण्यात आलं".

"नंतर माझ्या ऐकण्यात आलं की, या हिंदी चित्रपटाचं अर्धे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. हे ऐकून मला शॉक बसला.  चित्रपटात रिप्लेस करणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण साधी कल्पना न देणं किती अव्यावसायिक आहे.  मला पुर्णपणे जाणीव आहे मी काही मोठी स्टार नाही.  मला हे देखील माहित आहे की, अभिनय हे स्वतंत्र काम आहे. पण जे काही आता घडलं ते अनादरपूर्ण आणि अव्यावसायिक आहे.  आपण आपल्या आयुष्यात अपमान आणि दु:ख पचवत असतो.  आपण असंही म्हणतो की, इंडस्ट्री ही अशीच चालते.  आपण आयुष्यात पुढे जात असतो. प्रत्येक अपमानाने आपण अधिक मजबूत होत असतो.  परंतु, लहान असो किंवा मोठा, प्रत्येक कलाकार आदरास पात्र आहे", असं विभावरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"आपण  अनादर, असंवेदनशील आणि अव्यावसायिक वर्तनाला सामान्य तर बनवत नाही आहोत ना..? साधं संवाद अपेक्षित करणं चुकीचं आहे का? मी या ठिकाणी कुणाचंही नाव घेणार नाही. कारण मला काम मिळणार नाही, याची भीती अजिबात नाही. माझी ही पोस्ट कुणाचीही बदनामी करण्यासाठी नाही. माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली, माझे विचार मी मांडले.  माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आतापर्यंत याहून वाईट अनुभव सहन केले आहे.  बाकी सगळं काही  फर्स्ट क्लास आहे..." असं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prarthana Behere Father: 'तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…'; प्रार्थना बेहेरेची वडिलांसाठी भावूक पोस्ट, वर्षश्राद्धानिमित्त आठवणींना उजाळा
'तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…'; प्रार्थना बेहेरेची वडिलांसाठी भावूक पोस्ट, वर्षश्राद्धानिमित्त आठवणींना उजाळा
Tejashree Pradhan on Nivedita Ashok Saraf: 'हिच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
'हिच आमची सुपरस्टार आई'; तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ यांच्यासाठी खास कविता, मायलेकींचं नातं शब्दातून उलगडलं
Dia Mirzas Diwali Video Controversy: 'दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत'; अभिनेत्रीच्या VIDEOवर भाजप नेत्याची टीका, BMCने पोस्ट हटवली
'दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत'; अभिनेत्रीच्या VIDEOवर भाजप नेत्याची टीका, BMCने पोस्ट हटवली
TV Actor Death: 'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला
'पहाटे अलार्म वाजला, आई उठवायला गेली, पण तो उठलाच नाही'; प्रसिद्ध TV अभिनेत्याचं निधन, झोपेतच झटका आला

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
CPR Kolhapur: थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
थोरला दवाखाना सीपीआरच्या नुतनीकरणावर 600 कोटींचा खर्च अन् प्रसुती विभागासमोर नव्या छताला गळती; दोन महिन्यांपूर्वीच लोकार्पण
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Mahalaxmi Express Robbery: सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
सिग्नल यंत्रणाच बिघडवली अन् थेट महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूट; महिलांचे लाखोंचे दागिने हिसकावत दरोडेखोर लंपास, सातार्‍याजवळ मध्यरात्री थरार!
Mugdha Deshmukh Death Case Pune: लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
लंडनहून गुपचूप पुण्यात आली; पुढे बंद फ्लॅटमध्ये मुग्धा देशमुखचा मृतदेह, चक्रावून सोडणारा धक्कादायक घटनाक्रम
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Embed widget