एक्स्प्लोर

Sharmishta Raut On Entertainment Industry: 'ते पाठीवरुन फार विचित्र पद्धतीनं हात फिरवायचे...'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत सेटवरच 'नको ते कृत्य'

Sharmishta Raut On Entertainment Industry: पहिल्याच मालिकेच्या वेळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शर्मिष्ठाच्या वाट्याला आलेला नको तो अनुभव. स्वतःच एका मुलाखतीत बोलताना केलाय खुलासा.

Sharmishta Raut On Entertainment Industry: मनोरंजन विश्व (Entertainment World) जेवढं झगमगतं, चमचमतं दिसतं, तेवढीच काळ्याकुट्ट अंधारानं माखलेली त्याची दुसरीही बाजू आहे. एकीकडे ग्लॅमरचं जग, दुसरीकडे अतिशय घाणेरड्या अनुभवांचा सामना करत, अनेक कलाकार इथे आलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत असतात. काहींना यश मिळतं, तर काहींच्या वाट्याला फक्त हादरवणारे, घाणेरडे अनुभव येतात. याबाबत अनेक अभिनेत्रींनी, अभिनेत्यांनी खुलासा केला आहे. अशाच एका वाईट अनुभवाचा खुलासा मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं (Actress Sharmishta Raut) केला आहे. पहिल्याच मालिकेच्या वेळी आलेल्या घाणेरड्या अनुभवाबाबत शर्मिष्ठानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

शर्मिष्ठा राऊत नेमकं काय म्हणाली? 

काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना शर्मिष्ठा राऊतनं तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत सांगितलें. शर्मिष्ठा म्हणालेली की, "मी ही घटना आधी सांगितली आहे की, नाही ते मला आठवत नाहीये. मी एक शो करायचे. इंडस्ट्रीत पदार्पण केल्या केल्या शो केला. मी त्या कार्यक्रमाचं आणि निर्मात्यांचं नाव घेणार नाही कारण ते खूप चांगले आहेत. तिकडे एक अभिनेते होते, ते ज्या पद्धतीनं मी सेटवर आल्यावर मला ग्रीट करायचे, ते मला समजत होतं की, चुकीचं आहे. त्यावेळी मी खूप प्रसिद्ध अभिनेत्रीही नव्हते... माझी अगदीच सुरुवात होती. ते ज्या पद्धतीनं मला ग्रीट करायचे, मला समोरून मिठी मारायचे. तेव्हा मला त्यांचा स्पर्श कळायचा. मला कळायचं की, हा स्पर्श चुकीचा आहे. पाठीवरून फार विचित् पद्धतीनं हात फिरवायचे..."

पुढे बोलताना शर्मिष्ठा म्हणाली की, "तेव्हा माझं असं झालेलं की, आताच आलोय आणि काहीच माहित नाहीये. हे घरीही जाऊन सांगता येणार नाही. त्यांनाही टेन्शन येणार. मी कसं बोलू? मला कळत नव्हता. हे दोन-तीनदा त्या सेटवर तसंच झालं . मग मी एक दिवशी ठरवलं की, मी बोलणार. जास्तीत जास्त काय होईल आपण इंडस्ट्रीतून बाहेर होऊ. आउट झालो तरी, माझ्याकडे डिग्री आहे. मी पंधरा ते वीस हजाराची नोकरी कमावू शकते.मला काही गोष्टींवर बोललंच पाहिजे.हेच मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं आहे.त्यानंतर पुन्हा एकदा ते सेटवर मला मिठी मारायला आले 'अरे हाय म्हणून. तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर मी घातलीय तर त्यांना कळलं नाही, मी काय बोलतेय तेव्हा मी त्यांना म्हटलं 'सर चेक करू नका मी माझे अंतर्वस्त्र घातलेले आहेत.' इतकं धडधडीत मी 70 लोकांसमोर मोठ्यांदा बोलले..."

"त्यानंतर त्यांनी पुन्हा असं कधीच केलं नाही. ते मी आले की समोरही यायचे नाहीत. आले तरी साईडला जायचे. ही गोष्ट मी कधी घरीही सांगितली नाही कारण मला कळायचं नाही सांगू की नको. पण मी बाहेर बोलून मोकळी झाले होते. मला असं वाटतं की, ही निर्णय घेण्याची क्षमता, हा स्पष्टवक्तेपणा मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. आणि जर कोणाबरोबर असं काही घडत असेल तर त्याच क्षणी या प्रवृत्तीला ठेचा. त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.", असं शर्मिष्ठा राऊत म्हणाली. 

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतनं 'हे मन बावरे' , 'अबोली' , 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकांमध्ये काम केलंय. तसेच, तिनं 'चि व चि.सौ.का', 'रंगकर्मी' आणि 'योद्धा' या सिनेमांमध्ये काम केलंय. 'चि व चि.सौ.का', 'रंगकर्मी' आणि 'योद्धा' या चित्रपटांमध्ये शर्मिष्ठानं महत्वाची भूमिका साकारलीय. त्यानंतर शर्मिष्ठाच्या 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतही दिसलेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Filmmaker Ashok Pandit Objects To IND vs PAK Match: 'पाकिस्ताननं आपल्या कित्येक सैनिकांना जिवंतपणी बॉम्ब लावून उडवलंय...'; IND vs PAK च्या मॅचवरुन बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता खवळला

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget