एक्स्प्लोर

Priyadarshini Indalkar On Love And Marriage: 'आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय, पुढच्या पिढीचं काय होणार?'; प्रेमाबद्दल प्रियदर्शिनी इंदलकरनं मांडलं भयाण वास्तव

Priyadarshini Indalkar On Love And Marriage: प्रियदर्शनीला लग्न करायचंय, पण सध्याची परिस्थिती पाहता ती फारच द्विधा मनस्थितीत अडकल्याचं ती सांगतेय.

Priyadarshini Indalkar On Love And Marriage: आपल्या विनोदी अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) म्हणजे, अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या प्रियदर्शनीनं अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलंय. तिचे 'रुखवत' आणि 'दशावतार' हे सिनेमे तुफान चालले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियदर्शनीनं लग्न, प्रेम या विषयांवर भाष्य केलं. 

प्रियदर्शनीला लग्न करायचंय, पण सध्याची परिस्थिती पाहता ती फारच द्विधा मनस्थितीत अडकल्याचं ती सांगतेय. प्रियदर्शनीनं नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं प्रेमाबद्दलचं भयाण वास्तव मांडलं आहे. 

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर काय म्हणाली? 

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली की, "आज सोशल मीडियावर 10 पोस्ट पाहिल्या तर एक पोस्ट म्हणते की, प्रेम सगळं काही आहे... दुसरी पोस्ट म्हणते की, प्रेमात आंधळे होऊ नका, करिअरकडे लक्ष द्या... पुढची पोस्ट म्हणते की, आत्मसन्मान महत्वाचा आहे, प्रेम वगैरे सगळं नंतर... पुढे कपल्सवर एखादी कॉमेडी रील दिसते, तर कधी कपल्सचे सुंदर फोटो पाहून आपल्यालाही असा पार्टनर हवा असं वाटतं..."

पुढे बोलताना प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली की, "एवढी स्वप्न दाखवणारं सोशल मीडिया झालं आहे. एक खोटं जग आपल्या समोर तयार होतं... त्यामुळे लग्नाचा निर्णय घेणं आता आणखी कठीण झालं आहे. कारण एका निर्णयावर ठामच राहता येत नाही... खूप फाटे फुटतात... सोशल मीडियावर आपलं इतकं ब्रेन रॉटिंग सुरू आहे, त्यामुळे आपल्या पिढीला आता आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेणं खूप कठीण झालं आहे. आत्ताच्या पिढीलाच हे इतकं कठीण जातंय पुढच्या पिढीचं काय होणार...?"

"सध्या घटस्फोटाचं प्रमाणही वाढतंय... तुम्ही जर वयाची तिशी ओलांडली असेल आणि अविवाहित असाल तर तुम्ही एक घटस्फोट चुकवला असं सध्या म्हटलं जातं. कारण अनेक असे लोक आहेत, ज्यांनी पंचविशीत लग्न केलंय आणि 30 व्या वर्षी त्यांचा घटस्फोट झालाय... ही खूप भयानक परिस्थिती आहे... पण तरी प्रेम, लग्न याबद्दल मी अजूनही आशावादी आहे. मला तर नक्कीच लग्न करायचंय पण एकंदर सगळी परिस्थिती पाहता जरा द्विधा मन:स्थिती आहे.", असं प्रियदर्शनी इंदलकरचं म्हणणं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget