एक्स्प्लोर

Marathi Actress Bad Experience: 'इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत नेलं; गाडीत कोंबलं अन् ..' मराठी अभिनेत्रीचा हादरवून टाकणारा अनुभव; इंडस्ट्रीत खळबळ

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत ऑडिशनमध्ये घडलेला एक हादरवून टाकणारा प्रसंग सांगितलाय.

Meera Joshi: मनोरंजनसृष्टी झगमगटामागची दुनिया ही कलाकारांसाठी अनेकदा डोकेदुखीच ठरते. अनेक बऱ्या वाईट अनुभवातून हे कलाकार प्रेक्षकांसमोर येत असतात. विशेषतः महिला कलाकारांना येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवांची कायम इंडस्ट्रीत चर्चा रंगते. कास्टिंग काऊच, सोशल मीडियावर होणारे ट्रॉलिंग, दिग्दर्शक निर्मात्यांकडून येणारे वाईट अनुभव अशा अनेक गोष्टींविषयी आता कलाकार उघडपणे व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत ऑडिशनमध्ये घडलेला एक हादरवून टाकणारा प्रसंग सांगितलाय. मराठी इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवरही ती फार स्पष्टपणे बोलली आहे.  अनेक मालिकांमध्ये, वेब सिरीज चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री मीरा जोशीने मराठी इंडस्ट्रीतील तिचा अनुभव शेअर केलाय. मराठी इंडस्ट्रीत योग्य वागणूक मिळत नसल्याचेही ती म्हणलीय. ऑडिशन देताना तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र प्रसंगाविषयी तिने 'इट्स मज्जा' ला सांगितलं.

इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत आणलं अन्..

अभिनेत्री मीरा जोशीने तिच्यासोबत घडलेले अनेक असे प्रसंग सांगितले आहेत. ती म्हणाली 'एका इव्हेंटला पोहोचल्यानंतर, कोरिओग्राफर मित्र सतत 'कोणालातरी बोलून घे' असं सांगत होता. परफॉर्मन्स झाल्या झाल्या, त्याने इव्हेंटचाच कपड्यात मला स्टेजवरून ओढत आणलं, गाडीत कोंबलं पैसे दिले आणि आत्ताच्या आत्ता निघून जा असं सांगितलं. माझा मित्र आणि मी गाडी चालवत निघालो, त्यावेळी एका बंद टोल नाक्यावर अचानक 15-20 लोक दगड घेऊन आले. आम्हाला कळलं नाही काय होतंय. आमच्या गाडीचा खूप वेळ पाठलाग केला. आम्ही गाडी पळवतोय आमच्या मागे त्या लोकांची गाडी  पाठलाग करत होती. 100 नं ला फोन लावत होतो पण तोही लागत नव्हता. एक पेट्रोलिंगची गाडी दिसली, पोलिसांनी आम्हाला एका टोल नाक्यापर्यंत पोहोचलो त्यावेळी पाठलाग करणारे लोकांची गाडी आमची वाट बघत तिथेच थांबली होती . पोलिसांनी आमची गाडी पुढे पाठवली. पुढचा टोलवर पोहोचलो त्यावेळेस तो माणूस बॅरिकेट उघडायला तयार नव्हता . 'आम्ही गाडी सोडणार नाही तुम्हाला वापस बोलावलंय 'असं सांगितलं गेलं. शेवटी माझ्या मित्राने बॅरिकेट तोडलं आणि मग आम्ही मुंबईत आलो. नंतर एक दोन महिन्यांनी मला फोन आला की 'आमची सर्विस कशी वाटली तुम्हाला, आमच्या इव्हेंटला पुन्हा या ' मला माहित नाही ते मला किडनॅप करणार होते की अजून काय! पण तेव्हा मी खूप हादरले होते, असं मीरा जोशीने सांगितलं .

कपडे बदलायला सांगितलं अन् ..

अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली 'मी खूप नवीन होते तेव्हा ऑडिशनला गेले होते..ऑडिशनसाठी मी वेस्टर्न कपडे घातले होते. मला म्हणाला की पारंपरिक कपड्यात ऑडिशन हवी आहे.मी त्यांना विचारलं की चेंजिंग रूम कुठे आहे ?  त्यावर त्यांनी सांगितलं की चेंजिंग रूम नाहीये तू ऑडिशन रूममध्येच चेंज कर. मी म्हणलं ठीक आहे. मी कपडे बदलणार तेवढ्यात मला दिसलं की हॅंडीकॅम रेकॉर्डिंग मोडवर होता. पण तेव्हा मी एवढी बोर्ड नव्हते की समोरच्याला चार शब्द ऐकवूनन बाहेर पडावं. मी हँडीकॅमचा अँगल बदलला. ऑडिशन दिली आणि बाहेर पडले. ज्या कॉर्डिनेटरने मला त्या ऑडिशनला पाठवलं होतं त्याला मी सांगितलं की असं झालं आहे.त्यांनी तो मेसेज बाकीच्या मुलांना एक अलर्ट म्हणून पाठवला.हा अलर्ट म्हणून पाठवलेला मेसेज ऑडिशन घेणाऱ्या माणसापर्यंत पोहोचला.तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागला.मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूनच देणार नाही.तुझा मर्डर करतो.तुझ्या घरी येतो वगैरे ..मी एकटी राहायचे त्यामुळे घाबरले.त्यामुळे मग मी त्याची पोलिसात तक्रार केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

पोलिसांनी त्याला पकडलं.तोपर्यंत माझे काही फोटोज व्हायरल झाले होते ज्यावर Available असं लिहिलं होतं. हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते, त्यावर माझा नंबरही होता. त्यानंतर मी एक फेसबुक पोस्ट केली होती,हे सगळं कोण करताय वगैरे..आणि माझा नंबरही बदलून टाकला." असं मीरा जोशीने सांगितलं.  तिच्या या मुलाखतीची सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget