Madhu kambikar passes away: नृत्य करताना अस्वस्थ वाटलं, मेकअप रूममध्ये आला पक्षाघाताचा झटका; 10 वर्षांपूर्वी मधू कांबीकरांसोबत काय घडलं होतं?
Marathi Actress Madhu kambikar: मधु कांबीकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला.

Madhu kambikar Death: मराठी विश्वातील दिग्गज (Marathi Actress) आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांचं निधन झालं आहे. मधु कांबीकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला (Marathi Industry) मोठा धक्का बसला. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी लोककलावंत म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्रदीर्घ आजारामुळे त्यांची पुण्यात प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात दु:खाचा डोंगर कोसळला. 2016 साली त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. नृत्य सादर करत असताना त्यांना त्रास झाला होता. 10 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? सिनेसृष्टीपासून इतके वर्ष मधु कांबीकर का दूर होत्या? जाणून घेऊयात.
10 वर्षांपूर्वी मधु कांबीकर यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? (Madhu kambirkar passes away at the age of 75)
मधु कांबीकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात तमाशाच्या फडातून झाली. 1973 साली त्यांनी मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. लावणी व्यतिरिक्त त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 1977 साली दिल्लीमध्ये त्यांनी 'महाराष्ट्राची लोकधारा' या कलापथकाच्या माध्यमातून नृत्य सादर केले. चित्रपटांमध्ये त्यांनी अनेकदा आई आणि सासूची भूमिका साकारली आहे. 'सतीची पुण्याई', 'एक होता विदुषक', 'चल रे लक्ष्या मुंबईला', 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' 'झपाटलेला' यांसारख्या सिनेमात काम केलं. केवळ तमाशा अन् चित्रपट नाही तर, त्यांनी नाटकातही काम केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 'विच्छा माझी पूरी करा' आणि 'भानगडीशिवाय पुढारी नाही' या नाटकात काम केलं.
10 वर्षांपूर्वी मधु कांबीकर यांच्या आयुष्यात भयंकर घटना घडली. 27 नोव्हेंबर 2016 रोजी मधु कांबीकर यांना एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. 10 वर्षांपूर्वी मधु कांबीकर यांचा मुंबईतील मांटुगा येथील यशवंत नाट्यमंदिरात 'लावण्य संगीत' नावाचे कार्यक्रम होते. या कार्यक्रमात मधु कांबीकर या नृत्य सादर करणार होते. तब्बल 12 वर्षानंतर त्यांनी नृत्य सादर केले होते. पण कार्यक्रमात त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. प्रकृती खालावली असली तरी, त्यांनी आपले नृत्य सादर केले. यानंतर मधु कांबीकर मेकअप रुममध्ये गेल्या. त्याच वेळी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. यात त्यांचा उजवा हात बधीर झाला.
तेव्हापासून मधु कांबीकर या अंथरुणाला खिळल्या होत्या. आजारामुळे त्यांना ना चित्रपटात काम करता आलं, ना नृत्य सादर करता आलं. एका पक्षाघाताच्या झटक्यामुळे त्यांच्या आयुष्याने वेदनादायी वळण घेतलं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका























