एक्स्प्लोर

Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका

Madhu Kambikar Death news: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Madhu Kambikar Death: मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  पुण्यात त्यांचं निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.  गेल्या अनेक  वर्षांपासून अभिनेत्री आजाराशी झुंज देत होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेसृष्टीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मधु कांबीकर यांचं निधन (Marathi Actress Madhu Kambikar Death news)

मिळालेल्या माहितीनुसार,  28 जुलै 1953 साली मधु कांबीकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.  तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं.  चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.

एका आजारमुळे मधु कांबीकर यांचं आयुष्य बदललं 

मराठी सिनेसृष्टीतील मधु कांबीकर या महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. लावणी आणि सहज सुंदर अभिनयासाठी मधु कांबीकर यांची विशेष ओळख होती. लावणी क्षेत्रासह अभिनयातही त्यांचे विशेष योगदान होते. त्यांनी आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यांनी मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशेषत: त्यांनी आई आणि  सासूच्या भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांच्या आयुष्यात एक असा काळ आला की, त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. 

आजारामुळे अंथरुणाला खिळल्या, नक्की काय घडलं होतं?

27  नोव्हेंबर 2016 रोजी  मधु कांबीकर यांच्या आयुष्यात अत्यंत वेदनादायी घटना घडली. त्या दिवशी मधु कांबीकर यांचा एक कार्यक्रम होता.  मुंबईतील मांटुगा येथील यशवंत  नाट्यमंदिरात 'लावण्य संगीत' या कार्यक्रमात यांनी नृत्य सादर केले होते. तब्बल 12 वर्षांनंतर मधु कांबीकर स्टेजवर नृत्य सादर करणार होते.  पण कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना त्यांची अचानक प्रकृती खालवली. मधु कांबीकर यांना अस्वस्थ वाटू लागलं.  पण त्यांनी नृत्य सादर करणं थांबवलं नाही. त्यांनी जिद्दीने सादरीकरण पूर्ण केलं. यानंतर त्या मेकअप रुमध्ये गेल्या. त्यांची प्रकृती अधिक खालवली.  मेकअप रुममध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यांचा उजवा हात बधीर झाला असल्याची माहिती आहे.  त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

आपल्या आजारपणामुळे मधु कांबीकर यांना अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं. त्यांना आपल्या कलेपासून दूर राहावं लागलं. ही बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.  मधु कांबीकर यांचे अभिनय क्षेत्रात मोठे योगदान आहे.  2018 साली त्यांना झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. पण प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने त्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी सोहळ्यात उपस्थित राहू शकल्या नाहीत.  मधु कांबीकर यांच्यावतीने सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
शेकोट्या पेटल्या! वारं फिरलं, दुष्काळी पट्ट्यात गुलाबी थंडीला सुरुवात, IMDचा अलर्ट, पूर्ण आठवडा कशी असणार थंडी?
IND VS PAK Asia Cup U19 Final Celebration Video: फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
फायनल जिंकताच सगळे सेलीब्रेशन करत बसले; पण टीम इंडियाचा एक खेळाडू पाकिस्तानच्या खेळाडूसमोर उभा ठाकला, पुढे काय घडलं?, VIDEO
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Embed widget