Chinmayeee Sumeet Accident: 'डोळ्यांना सूज, चेहऱ्यावर जखमा...'; अभिनेत्री चिन्मयी सुमितचा अपघात, VIDEO शेअर करत म्हणाली...
Chinmayeee Sumeet Accident: अभिनेत्री चिन्मयी सुमित हिच्या गाडीला भीषण अपघात झाला असून सुजलेले डोळे आणि चेहऱ्यावरच्या जखमांसोबत अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर केलाय.

Chinmayeee Sumeet Accident: राज्यातील शाळांमध्ये (Maharashtra School) हिंदी सक्तीचा (Hindi Language) जीआर रद्द करण्यात आला असला तरीसुद्धा राज्यातील मातृभाषा मराठीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात आता अनेकांनी एल्गार पुकारला आहे. राजकीय नेतेमंडळींसोबतच अनेक सामाजिक संस्था, सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य माणसंही यासाठी रस्त्यावर उतरली आहेत. तसेच, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येऊन आंदोलनाची हाक दिली होती. आता जीआर रद्द केल्यामुळे आंदोलन होणार नसल्याचं जाहीर केलं आहे, पण त्याऐवजी विजयी मेळावा घेणार आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. पण, अभिनेत्री चिन्मयी सुमीतनं (Actress Chinmayeee Sumeet) मात्र, मला उपस्थित राहता येणार नसल्याचं जाहीर केलेलं. याबाबत अभिनेत्रीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन खंत व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री चिन्मयी सुमित हिच्या गाडीला अपघात झाला होता, पण त्यातून त्या सुखरुप बचावल्या. चेहऱ्यावर जखमा आणि डोळ्यांवर सूज असल्यानं कलाकारांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये अभिनेत्री काय म्हणाली?
अभिनेत्री चिन्मयी सुमितनं एक व्हिडीओ शेअर करुन धक्कादायक माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चिन्मयीच्या चेहऱ्यावर जखमा दिसत होत्या. तसेच, तिचे डोळे प्रचंड सुजलेले होते. तिला पाहून चाहते हैराण झाले होते. तोच चिन्मयीनं यासंदर्भात माहिती दिलेली. व्हिडीओमध्ये बोलताना चिन्मयी म्हणाली होती की, "नमस्कार मी चिन्मयी सुमीत, आज 29 जून, आपण गेले काही दिवस तिसरी भाषा हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करत आहोत. गेले अडिच महिने आम्ही रान पेटवलंय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.", असं म्हणत चिन्मयीनं आपल्याला आंदोलनाला उपस्थित राहता येणार नसल्याचं जाहीर केलं आणि कारणंही सांगितलं.
पुढे बोलताना चिन्मयीनं सांगितलं की, "दोन दिवसांपूर्वी माझा एक अपघात घडला, त्यामुळे आंदोलनाला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टरांनी मला परवानगी दिलेली नाही. मी तिथे जरी शरीरानं नसली तरी तमाम मराठी जनांना अत्यंत मी आवाहन करते की, या आंदोलनात आपली संख्या अंत्यंत मोठ्या प्रमाणात दिसू द्या. पहिल्यांदा असं होतंय जेव्हा राजकीय पक्ष आणि नागरीक समजा कोणत्या तरी एका विषयावर एकत्र येऊन आदोलन उभं करत आहेत. त्या सर्व राजकीय पक्षांना माझे मनापासून धन्यवाद. मी आज तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला खूप मोठी खंत वाटते, पण मला विश्वास आहे की तुम्ही सर्व मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहाल आणि ते आंदोलन कराल. आपण एकत्र आलो आहोत. एकत्र संघर्ष करुयात, विजयी होऊया. जय भीम, जय हिंद आणि जय महाराष्ट्र. जय मराठा."
दरम्यान, व्हिडीओमध्ये चिन्मयी सुमितची परिस्थिती पाहून चाहते पुरते हादरुन गेले. चिन्मयीच्या चेहऱ्यावरच्या जखमा, तिचे सुजलेले डोळे पाहून सारेच हादरले. चाहत्यांकडून चिन्मयी सुमितला काळजी घेण्याचं सांगितलं जात आहे. तसेच, लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.























