एक्स्प्लोर

Bhagyashree Nhalave Mother Passes Away: मराठी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; दोनच महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, म्हणाली, 'म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं...'

Bhagyashree Nhalave Mother Passes Away: अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिनं दोन महिन्यांपूर्वीच आपली लग्नगाठ बांधलेली. पण, आईच्या निधनानंतर मात्र, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करुन लग्न केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच, लग्न का करायचं नव्हतं, याचं कारणंही दिलं आहे. 

Bhagyashree Nhalave Mother Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातून (Entertainment Post) एक दुखःद बातमी समोर आली आहे. मराठी मनोरंजनविश्वातली (Marathi Entertainment World) प्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतः अभिनेत्रीनं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे (Bhagyashree Nhalve) हिनं दोन महिन्यांपूर्वीच आपली लग्नगाठ बांधलेली. पण, आईच्या निधनानंतर मात्र, अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करुन लग्न केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच, लग्न का करायचं नव्हतं, याचं कारणंही दिलं आहे. 

अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट नेमकी काय? 

अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आई......! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आई ने मला एकही फोन केला नाही. का तर "सासरी गेलेल्या मुलीला आई ने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही." अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली. आणि आता माझ्या आई चा कधीच फोन येणार नाही...लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत पण तू मला सोडून गेलीस...हे मला मान्य होत नाहीये.. मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी रहायचा होत म्हणून मला लग्न न्हवत करायचं...पण तू....! ,"माझी शेवट ची इच्छा आहे राणा तू माझ्या साठी लग्न कर, आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्ती केलं आहेस.. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी" खूप ठाम तिचा निर्णय." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree Nh🇮🇳 (@bhagyashreenh)

"एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आई ची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्या साठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्या साठी किती बरोबर आहे. तुझ्या साठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिले.... माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग ? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणा ला दिवा लावायचे आणि तुझ्या साठी प्रार्थना करायचे...पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणा सोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस.... तुला सगळं उपजत होत आई. म्हणून तू माझी सोय करून गेलीस...आई ला लेकराच चांगलाच कळत हे खरच...पण तरीही आई तू मला हवी होतीस.... आता मला कोण राणा म्हणेल... मला संसारात पाडलंस... आणि तू मात्र निघून गेलीस... तू सांगितल्या प्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे...", असं भाग्यश्री न्हाळवे हिनं सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'कुंकू, टिकली आणि टॅटू', 'रमा राघव', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर', 'माटी से बंधी डोर' या मालिकांमधून अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेनं प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. भाग्यश्रीची आई गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. अखेर तिच्या आईनं जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीनं आपल्या लग्नातला आईसोबतचा फोटो शेअर करुन एक दुःखद पोस्ट केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Zee Marathi Kamali Serial: 'कमळी' मालिकेत नवा ट्विस्ट! कमळी अन् अन्नपूर्णा आजींची होणार भेट; मालिकेत रंगणार नवा अध्याय
'कमळी' मालिकेत नवा ट्विस्ट! कमळी अन् अन्नपूर्णा आजींची होणार भेट; मालिकेत रंगणार नवा अध्याय
Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री करतेय नवी सुरुवात, व्हिडीओतून दिली गुडन्यूज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री करतेय नवी सुरुवात, व्हिडीओतून दिली गुडन्यूज
KBC Madhuri Dixit and Sachin Pilgaonkar: 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सचिन पिळगावकरांची एन्ट्री, माधुरी दीक्षितला म्हणाले, 'सुंदर मुली नेहमी कठीण प्रश्न...', अभिनेत्रीचं भन्नाट उत्तर
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सचिन पिळगावकरांची एन्ट्री, माधुरी दीक्षितला म्हणाले, 'सुंदर मुली नेहमी कठीण प्रश्न...', अभिनेत्रीचं भन्नाट उत्तर
Ashok Saraf on Bhau Kadam: 'भाऊ कदम सक्सेसफुल आहे, कारण त्याचा चेहरा...'; अशोक सराफांनी केलं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
'भाऊ कदम सक्सेसफुल आहे, कारण त्याचा चेहरा...'; अशोक सराफांनी केलं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Accident News: न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानं घरातून गाडी नेली; मध्यरात्रीच्या सुमारास दिली दुचाकीस्वाराला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
NZ vs IND T20 : सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
सलग दोन पराभवांनंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय! 'हा' खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर, टीम इंडियाशी लढण्यासाठी संघात मोठे बदल
Beed Crime News: हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
हॉटेल मालकासह त्याच्या भावाचाही त्रास; पैशांवरून शिवीगाळ, आर्थिक अन् मानसिक छळ, मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला लावली दोर; बीडमधील घटना
Raju Shetti: '4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
'4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..' स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली
Embed widget