एक्स्प्लोर

Vaibhav Mangale On KBC 17 Kid Ishit Bhatt: 'KBCच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर...', मराठी अभिनेत्याकडून शंका उपस्थित

Vaibhav Mangale On KBC 17 Kid Ishit Bhatt: मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन एक वेगळीच बाजू सर्वांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

Vaibhav Mangale On KBC 17 Kid Ishit Bhatt: 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) आलेल्या एका पाचवीतल्या मुलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचं झालं असं की, गुजरातचा इशित भट्ट (Ishit Bhatt) 'कौन बनेगा करोडपती'शोमध्ये हॉटसीटवर बसलेला. त्यावेळी खेळ सुरू झाला आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण, शोच्या सुरुवातीपासूनच हा मुलगा विचित्रपणे, अत्यंत उद्धटपणे बोलत होता. बिग बींशी आदरानं वागणं तर सोडा, साधं नीटही बोलत नव्हता. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सारचेजण मुलाच्या विचित्र वागण्यावर प्रश्न उपस्थित करु लागले. त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर मराठी अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यानं या संपूर्ण प्रकरणाची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर मांडली आहे. 

मराठी अभिनेते वैभव मांगले (Marathi actor Vaibhav Mangle) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन एक वेगळीच बाजू सर्वांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, शंका उपस्थित करुन सर्वांना एका भीषण वास्तवाचीही जाणून करून दिली आहे. केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत, असं वैभव मांगले यांनी म्हटलं आहे.   

काय म्हणाले अभिनेते वैभव मांगले? 

लोकप्रिय मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट लिहित त्यामध्ये म्हटलंय, "केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला गेला. "

केबीसीमध्ये आलेल्या 'त्या' मुलाला मानसिक आजार?

संगीतकार कौशल इनामदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  त्यात त्यांनी म्हटलंय ती, त्यांची पत्नी सुचित्रा एक मानसशास्त्रज्ञ आहे. कौशल इनामदारांनी सांगितल्यानुसार, त्यांनी हा व्हिडिओ पत्नीला दाखवला, त्यावर मुलाला ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder असावा अशी शक्यता व्यक्त केली. हा विकार साधारपणे बालवयापासून सुरू होतो. त्यानंतरही अनेक वर्षांपासून या मानसिक विकाराची लक्षणं राहतात. ज्यामध्ये मुल हायपर अॅक्टिव्ह असतं. वागणुकीत संतुलन राहत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KBC 17 Kid Ishit Bhatt May Facing Mental Illness: केबीसीमधला उद्धट मुलगा मानसिक आजारानं ग्रस्त? सुप्रसिद्ध मराठमोळ्या संगीतकाराच्या पोस्टनं वेधलं लक्ष...

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Devendra Fadnavis On Tiger Shroff: डरपोक, भाडोत्री..सोडणार नाही, पोलिसांना धागेदोरे सापडले; टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगितलं
डरपोक, भाडोत्री..सोडणार नाही, पोलिसांना धागेदोरे सापडले; टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगितलं
Tiger Shroff Shooting Case: कॉपी पीस, पुष्पा पार्क आणि 45 मिनिटं; टायगर श्रॉफवर हल्ला करण्याआधी आरोपी काय करत होते?, हादरवणारी माहिती
कॉपी पीस, पुष्पा पार्क आणि 45 मिनिटं; टायगर श्रॉफवर हल्ला करण्याआधी आरोपी काय करत होते?, हादरवणारी माहिती
Tiger Shroff Forensic Report: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! देशी पिस्तुलाचा वापर अन् शूटरचे दोन प्रयत्न, दुचाकीवरुन आरोपी कसे पळाले? फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! देशी पिस्तुलाचा वापर अन् शूटरचे दोन प्रयत्न, दुचाकीवरुन आरोपी कसे पळाले? फॉरेन्सिक रिपोर्ट समोर

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Embed widget