एक्स्प्लोर

Ramesh Pardeshi father Death: प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर

Ramesh Pardeshi Father Death: रमेश परदेशी यांच्या वडिलांचे निधन. प्रवीण तरडेंनी शेअर केली भावूक पोस्ट.

Ramesh Pardeshi Loses His Father: मराठी कलाविश्वातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचे मित्र अभिनेते रमेश परदेशी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. रमेश परदेशी यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर ही दु:खद माहिती शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश परदेशी उर्फ पिट्या भाईंच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अशी  माहिती पोस्टद्वारे प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  रमेश परदेशी यांच्या वडिलांचे 22 ऑक्टोबर रोजी निधन झाले असल्याची माहिती आहे. त्यांच्या पोस्टवर सिनेकलाकार तसेच चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

रमेश परदेशी यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन (Ramesh Pardeshi Loses His Father Parshuram Pardeshi)

रमेश परदेशी यांच्या वडिलांचे नाव परशुराम परदेशी असल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनानंतर रमेश परदेशी यांच्यावर आणि परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम परदेशी यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले.   पुण्यात अंत्यविधी पार पडले असल्याची माहिती आहे.  परशुराम परदेशी यांच्या निधनानंतर रमेश परदेशी यांच्या अत्यंत जवळचे मित्र प्रवीण तरडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच परशुराम परदेशी यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रवीण तरडे यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये रमेश परदेशी यांची महत्त्वाची भूमिका असते.  अशातच रमेश परदेशी यांच्या वडिलांच्या निधनानंतर प्रवीण तरडे यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रमेश परदेशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'माझे वडील.  स्व. परशुराम लक्ष्मण परदेशी  यांचे दिनांक 22 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दु:खद निधन झाले. अंत्यविधी आज सायंकाळच्या सुमारास  वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होणार आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

प्रवीण तरडेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मित्राचे वडील हे सुद्धा एक सुंदर नातं असतं. पिट्याचे वडील आज गेले. शुन्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. लहानपणापासूनच्या त्यांच्यासोबत खूप आठवणी आहेत. मागील सहा महिन्यांपासून ते आजारी होते.   पिट्याने त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.    पण ते वाचू शकले नाहीत.   परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो.. आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो..  ओम शांती', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Salman Khan Aishwarya Rai: 'तू ऐश्वर्याला स्पर्श का केलास?'; 'हम दिल दे चुके सनम'मध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून सलमान खान झाला फिदा, संजय लीला भन्साळी भडकले

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Zee Marathi Award Show: झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड्समध्ये 7 आईंची धमाल! परफॉर्मेन्स जबरदस्त अन् मनोरंजनाचा फूल्ल तडका, दिमाखदार रंगला पुरस्कार सोहळा
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Sana Makbul HomeWrecker: 'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
'होमब्रेकर...' माही विज अन् जय भानुशालीचा सुखी संसार मोडल्याचा TV अभिनेत्रीवर आरोप; नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Advertisement

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget