एक्स्प्लोर

Lalit Prabhakar: इथून तिथून रूम काळीच! अभिनेता ललित प्रभाकरने सगळी रूम काळ्या रंगाने रंगवलीय; कारण ऐकून सगळेच थक्क

ललितने घरातील भिंतीला काळा दिलाय. पण त्याने असं का केलं याचं कारणही त्याने सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर ही एकच चर्चा रंगली आहे. 

Lalit Prabhakar: प्रत्येक कलाकाराची पडद्यामागची एक वेगळी दुनिया असते. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची नजर वेगळी असते. ही मंडळी सतत स्वतः चं कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी, आतली प्रतिभा तपासून वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. त्यासाठी एखाद्या वस्तूची साथ मिळते तर कधी एखादा रंगाची. 'आनंदी गोपाळ', 'मिडीयम स्पायसी', 'आरपार' अशा गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सध्या अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आलाय. एका मागोमाग एक दमदार प्रोजेक्ट करत चाललेल्या या अभिनेत्याचा 'सुपर डुपर' नावाचा चित्रपट प्रेक्षकांसमोर आलाय. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसतोय. 'मित्र म्हणे लाईम लाईट ' वर बोलताना त्याने घरातील एका खोलीला काळा रंग दिल्याचे सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर ही एकच चर्चा रंगली आहे. 

खरंतर प्रत्येकाला आपलं घर आपल्या कंफर्टनुसार ठेवायचं असतं. अनेक जण त्यांच्या घराला फ्रेश, फिकट रंगाचे, घरात आणखी उजेड आणणारे रंग देणं पसंत करतात. पण, ललितने घरातील भिंतीला काळा दिलाय. पण त्याने असं का केलं याचं कारणही त्याने सांगितलं. 

काय म्हणाला ललित ?

ललित म्हणाला ' अख्ख्या घराला काळा रंग नाही दिलाय. पण एक संपूर्ण खोली काळ्या रंगाची केली आहे .मी रंगकाम करायला ज्या माणसांना बोलावलं होतं त्यांना जेव्हा मी हे सांगितलं की काळा रंग द्यायचा आहे तेव्हा तेही हसले. त्यांना जोक वाटला. ते हसत म्हणाले, 'सांगा ना खरं सर कुठला रंग देऊ.' मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलं की खरंच हा रंग द्यायचा आहे. भिंतींना पण काळाच रंग आणि सीलिंगलाही काळाच रंग . अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी यामागे कारण काय? असं विचारतात तो आधी मजेने म्हणाला ' नजर लागते म्हणून ' . पण नंतर त्याने खरं कारण सांगितलं. तो म्हणाला ' याची बरीच कारणं आहेत. मला असं खूप एकटं वाटतं तिथे.मला छान वाटतं तिथे. मला असं वाटतं भिंतीमध्ये किंवा वेगळ्या वस्तूंमध्ये आपली नजर मरते. काळ्या रंगात आपली नजर मरत नाही.गावी गेल्यानंतर आपण जेव्हा गच्चीवर झोपतो तेव्हा आपली नजर अनंतापर्यंत जात असते. काळ्या रंगात नजर थांबत नाही. असं मला वाटतं या रंगामुळे छोटी वाटत नाही खोली. काळ्याला काही अंत नसतो. " असं ललित म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget