एक्स्प्लोर

Mansi Kulkarni on Second marriage: दुसऱ्या लग्नाबाबत मानसी कुलकर्णीचा विचार काय? म्हणाली, ' लेक लहान अन् सासरचे म्हणतात दुसरं लग्न...'

Mansi Kulkarni on Second marriage: मानसी कुलकर्णी दुसऱ्या लग्नाबाबत नेमकं काय म्हणाली?

Mansi Kulkarni on Second Marriage: ग्लॅमरच्या पडद्यामागे कलाकारांच्या आयुष्यात बरेच चढउतार येतात. पण अभिनयाच्या मुखवट्यामागे कलाकार बऱ्याच गोष्टी लपवतात अन् शो मस्ट गो ऑन असं म्हणतात. काही प्रोफेशनल तर, काही जण वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेत्री मानसी कुलकर्णी (Mansi Kulkarni) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  अनेक कलाकार आपल्या पार्टनरपासून विभक्त होतात. मानसी कुलकर्णी सध्या सिंगल पॅरेंट म्हणून आपल्या लेकीला सांभाळत आहे. दरम्यान, तिला घरातील सदस्यांकडून दुसरं लग्न करण्यासाठी सल्ला दिला जात आहे. पण तिने अद्याप दुसरं लग्न करण्याचा विचार केला नसल्याचं मुलाखतीत सांगितलं. मानसी कुलकर्णीचा दुसरं लग्न (Second Marriage) करण्याविषयी विचार काय?   तिने दुसरं लग्न का केलं नाही? (Actress) यावर तिने मुलाखतीत (Entertainment) प्रतिक्रिया दिली आहे.

दुसऱ्या लग्नाबाबत मानसी कुलकर्णी नेमकं काय म्हणाली? (Mansi Kulkarni Shars How in laws Supports her for second marriage)

अलिकडेच मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी हिने इट्स मज्जाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने, दुसऱ्या लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री म्हणाली की, 'मला घरचे, अजूनही, तरुण आहेस, दुसरं लग्न करण्याचा विचार कर, असं सांगतात. कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक लग्न करण्याचा सल्ला देतात. माझे सासरकडचे लोकही याविषयी माझ्याशी बोलले आहेत.  लग्न  करण्यासाठी सपोर्ट करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लेक लहान आहे, वयही झालं नाही, असं मला सांगितलं'.

'मी स्वत:वर इतक्या मर्यादा घातल्या नाहीत, पण मला सध्या तशी काही गरज वाटत नाही',  असं मानसी कुलकर्णी म्हणाली. 'मी स्वत:ला स्ट्राँग ठेवते असं नाही. कधीतरी मी देखील कोलमडते. शेवटी मी देखील माणूस आहे. फिजिकलपेक्षा मानसिकरित्या स्वत:ला स्ट्राँग ठेवायला खूप मेहनत घ्यावी लागते. शारीरिक फिटनेससाठी योगा,  व्यायाम बरेच पर्याय आहेत.  पण मेंटल हेल्थ स्ट्राँग ठेवण्यासाठी कोणतेही क्लासेस नाहीत.  आपल्याला यासाठी मेहनत घ्यावी लागते', असं मानसी म्हणाली.

'वाईट काळात कुणीतरी सोबत असावं, काही शेअर करण्यासाठी, समजून घ्यायला कुणीतरी हवं, असं वाटतं. नाही कोण तर मग, अशावेळी मी वॉकला जाते. अशा स्थितीत माझ्या लेकीने मला असं बघू नये, असं वाटतं. कारण तिच्यावर काय परिणाम होईल, हे मला ठाऊक नाही. तो परिणाम निगेटिव्ह होऊ नये, असं वाटतं.  मी बाहेर असेन तर, एकटीच बाहेर थांबून शांत होते. मी तिच्यापासून माझे सगळे इमोशन्स लपवून ठेवेन असं नाही.  लेक मोठी झाली की तिच्यासमोर नक्कीच व्यक्त होईल. माझे गुरु आहेत, जे सतत माझ्या पाठीशी उभे असतात, त्यांच्यासमोर शेअर करते. माझ्या बहिणीबरोबरही सगळं काही शेअर करते', असं मानसी कुलकर्णी म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मान्य आहे, तिने काही गोष्टी चुकीच्या...'; गौतमी पाटीलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? मराठी अभिनेता म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget