एक्स्प्लोर

Nikhil Chavan on Gautami Patil: 'मान्य आहे, तिने काही गोष्टी चुकीच्या...'; गौतमी पाटीलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? मराठी अभिनेता म्हणाला...

Nikhil Chavan on Gautami Patil: निखिल चव्हाणने गौतमी पाटीलसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला.

Nikhil Chavan Work with Gautami Patil: रातोरात फेम मिळवणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) विशेष ओळखीची गरज नाही. मराठी गाण्यांवरील ठसकेबाज अदांनी तिने अनेकांना घायाळ केलं. अभिनेत्री लवकरच मराठी सिनेमात (Marathi Movie) झळकणार असल्याची माहिती आहे. अलिकडेच 'देवघर ऑन रेंट' या सिनेमाच्या टीझरची प्रचंड चर्चा झाली.  या सिनेमात मराठी अभिनेता निखिल चव्हाण झळकणार असल्याची माहिती आहे. निखिल चव्हाणसोबत (Nikhil Chavan) गौतमी पाटीलही झळकणार आहे. टीझरमध्ये जरी गौतमी पाटीलची झलक दिसली नसली तरी, 'देवघर ऑन रेंट' (Devghar on Rent) या सिनेमात गौतमी झळकणार असल्याची माहिती आहे. अलिकडेच या सिनेमाच्या निमित्ताने निखिल चव्हाणने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने गौतमी पाटीलसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला.  तसेच तिचं आणि तिच्या कामाचंही कौतुक केलं. 

गौतमी पाटीलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? निखिल चव्हाण नेमकं काय म्हणाला? (Nikhil Chavan Work with Gautami Patil on Devghar on Rent)

निखिल चव्हाणला टेलिव्हिजनमुळे मिळाली. 'लागीर झालं जी' या मालिकेत त्यानं काम केलं होतं. या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली. आता तो लवकरच 'देवघर ऑन रेंट' या सिनेमात झळकणार आहे. अलिकडेच त्याने राजमंचला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्याने  गौतमी पाटीलसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. मुलाखतकाराने, 'गौतमी पाटील डान्स करणारी मुलगी आहे. तुला कशी वाटली? तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव कसा होता?', असा प्रश्न निखिलला विचारला. निखिल म्हणाला की,'तिचं मला कौतुक वाटलं कारण ती, आपल्या कामाला कला म्हणून पाहतेय. ती उपासना म्हणून करतेय. थिल्लरगिरी तिने कधी केली नाही. बोलण्यातून, वावरातून आपल्या काय पद्धतीची मुलगी आहे कळतं', असं निखिल चव्हाण म्हणाला.

'गौतमी पाटील खूप कष्टाळू आहे.  दुपारी 2च्या आसपास आमच्या साँगचं शूट होतं. तिचं त्याच दिवशी संध्याकाळी इव्हेंट देखील होता.  शूट करुन ती इव्हेंटला गेली.  इव्हेंटवरुन ती पुन्हा शूटसाठी आली.  रात्री आली, पहाटे 4- 5:30 पर्यंत आम्ही शूट करत होतो.  तिने कधीही शूट करताना तक्रार केली नाही.  तिने तिचं करिअर उभं केलं.  मान्य आहे तिने काही गोष्टी चुकीच्या केल्या.  महाराष्ट्राचा बिहार झाला नाही पाहिजे. महाराष्ट्रातील गोष्टी वेगळ्या आहेत.   तुम्ही डान्सचे कार्यक्रम ठेवत असाल तर, नक्कीच ठेवा.  जे कलाकृती सादर करत असतील, त्यांना आधीच सांगा, या पद्धतीचे प्रकार इथे चालणार नाहीत'.

'तुम्ही डान्सला कला म्हणून सादर करा. जर तिला सांगितलं तर ती नाही करणार', असं निखिल चव्हाण मुलाखतीत म्हणाला. सध्या त्याची निखिलाची मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तुला पत्नी म्हणून समान हक्क देईन...' लग्नाचं वचन देऊन महिलेचा छळ; एकत्र राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता फरार, 'महाभारत'मधील 'भीम'ला तुरुंगवास

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget