Marathi Movie :  सध्या महिलांवर आधारित अनेक कथानक असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचं पाहायला मिळतंय. अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना महिलावर्गाकडून अगदी भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. त्यातच आता महिलाकेंद्रित सिनेमांच्या यादीमध्ये आणखी एका सिनेमाचं नाव जोडलं जाणार आहे. या सिनेमातून एका सुप्रसिद्ध गायिकेचा प्रवास मांडला जाणार आहे. 'मंगला' (Mangala Movie) असं या सिनेमाचं नाव असून नुकतच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 


मंगला या गायिकेच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडदयावर येणार आहे. मंगलावर झालेला ऍसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच या ऍसिड अटॅक संबंधित कोणताही कायदा त्याकाळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला अशी खरीखुरी कथा पाहणं रंजक ठरणार आहे.


सिनेमातील नायिका अद्यापही गुलदस्त्यातच


जे मोशन पिक्चर रिलीज करण्यात आलं त्यामध्ये अभिनेत्री ही पाठमोरी बसलेली दिसत आहे.  ही महिला नेमकी कोण? मंगला ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं ाहे. एकूणच या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शिका अपर्णा हॉशिंग म्हटलं की, "हा चित्रपट महिलाकेंद्रित असून एका ज्ञात आणि अज्ञात महिलेच्या जीवनप्रवास दर्शिवणारा आहे. मंगला या चित्रपटात दिसणारी, गायनकलेची आवड असणारी ही महिला नेमकी कोण आहे हे लवकरच कळेल. हा चित्रपट आशयघन असून एका महान गायिकेचा प्रवास उलगडणार आहे. चित्रपट करताना खूप काही नव्याने प्रत्येकाला शिकायला मिळालं". 


'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग सांभाळली आहे.  तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे.






ही बातमी वाचा : 


Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?