Marathi Producer Meeting With Ajit Pawar : राज्यातील मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच भेट घेतली आहे. मराठी सिनेमांसाठी अनुदान द्याव यासाठी एक समीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. याच सिमितीवर निर्मात्यांकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या समितीमध्ये कोणाचेही नातेवाई नकोत अशी अट आहे.  पण ही देखील अट पाळली जात नसल्याचं म्हणणं या निर्मात्यांचं आहे. यावेळी निळू फुले यांची लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले (Gargi Phule) देखील होत्या. 


या सिमितीने अभिनेत्री अलका कुबल आणि त्याचे पती समीर आठल्ये देखील आहेत. पण नातेवाईकांची अट असताना हे समितीमध्ये कसा असा सवाल अभिनेत्री गार्गी फुले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ही समिती बरखास्त करण्याची मागणीही निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 


निर्मात्यांचे आरोप काय?


निर्मात्यांचं म्हणणं आहे की, या समितीमध्ये एकूण 28 सदस्य आहेत. पण केवळ पाचच सदस्य सिनेमा पाहून त्याला अनुदान द्यायचं की नाही,हा निर्णय घेतात. तसेच समितीमध्ये नातेवाईक नसावेत अशी सरकारची अट आहे. तरीही अभिनेत्री अलका कुबल आणि समीर आठल्ये समितीमध्ये कसे? असा सवाल देखील गार्गी फुले यांनी उपस्थित केला आहे. 


त्याचप्रमाण समितीने सर्व निर्णय एकांगी घेत असल्याचीही आरोप निर्मात्यांनी केला आहे. इतकचं नव्हे तर महाराष्ट्र सरकारकडून कान्स फेस्टिवलला तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमांना देखील अनुदानातून कसं नाकारलं असा देखील निर्मात्यांनी सवाल उपस्थित केला आहे. टकाटक या सिनेमाचे निर्माते विशाल कुदळे यांनी यावेळी अत्यंत खेदजनक असा प्रसंग देखील सांगितला आहे. सिनेमातील कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील अनुदान दिलं नाही, त्यामुळे वडिलांच्या वर्ष श्राद्धासाठीही पैसे देता आले नसल्याची खंत त्यांनी अजित पवारांजवळ बोलून दाखवली. 


आता निर्मात्यांच्या या मागण्यांचा विचार केला सरकारकडून केला जाणार का? अलका कुबल आणि समीर आठल्ये यांच्या सदस्यत्वावर काही कारवाई केली जाणार का? तसेच या सरकार काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 


ही बातमी वाचा : 


Emraan Hashmi : इमरान हाशमीच्या घरी जेव्हा त्याचे सिनेमे पाहिले जायचे, अभिनेता म्हणाला, 'त्या सीन्सच्या वेळी...'