नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) एका पॉडकास्ट मध्ये आयपीएलच्या 17 व्या पर्वात लखनौ सुपर जाएंटसचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आणि लखनौ सुपर जाएंटसचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांच्यातील वाद चर्चेत होता. लखनौच्या सलग दोन पराभवानंतर संजीव गोएंका यांनी केएल राहुलला ऑन कॅमेरा सुनावल्याच्या चर्चा सुरु होत्या. तो वाद खूप वाढल्यानंतर संजीव गोएंका यांनी केएल राहुलसोबत डिनर देखील केला होता. या वादासंदर्भात अमित मिश्राला एका पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. अमित मिश्रानं त्यावेळी काय घडलं होतं ते सांगितलं. 


अमित मिश्रानं सांगितलं त्यावेळी काय घडलेलं?


लखनौ सुपर जाएंटसनं सलग दोन सामने गमावले होते, त्यामुळं संजीव गोएंका नाराज झाले होते. केकेआरकडून 98 धावांनी पराभव स्वीकारला होता. त्यानंतर हैदराबादनं देखील पराभूत केलं होतं. मी देखील त्यावेळी नाराज झालो होतो. अर्धा तास अगोदर जाऊन बसमध्ये बसलो होतो, असं अमित मिश्रा म्हणाला. सनरायजर्स हैदराबादनं 6 ओव्हरमध्ये 90 धावा केल्या होत्या. लखनौच्या गोलंदाजांना षटकार पडत होते. अमित मिश्रानं शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये या बद्दल सांगितलं.  दोन मॅच पराभूत झालो होतो, हैदराबादनं 6 ओव्हरमध्ये मॅच संपवली होती. चौकार षटकार सुरु होते, मी नाराज झालो होतो तर ज्या व्यक्तीनं पैसे लावले आहेत त्यामुळं तो नाराज होणं स्वाभाविक होतं, असं अमित मिश्रानं सांगितंल. 


कशी बॉलिंग सुरु होती, किमान लढताय हे दाखवायचं होतं, नियोजन करुन बॉलिंग व्हायला हवी, तुम्ही तर त्यांच्या पुढं सरेंडर केलं होतं. 14 ओव्हरमध्ये, 18 व्या किंवा 19 व्या ओव्हरमध्ये मॅच संपायला हवी होती, कशी बॉलिंग होत होती, असा सवाल संजीव गोएंका यांनी केला होता, असं अमित मिश्रा म्हणाला. 


लखनौ सुपर जाएंटस कॅप्टन बदलणार?


लखनौ सुपर जाएंटस पुढील आयपीएलमध्ये केएल राहुलऐवजी चांगला पर्याय कॅप्टन म्हणून मिळतो का हे पाहावं लागेल, असं अमित मिश्रा म्हणाला. केएल राहुलला कमबॅक करण्याबाबत विचारलं होतं. त्यावर त्यानं मला तुला संधी द्यायची होती, मात्र शक्य होत नसल्याचं म्हटलं होतं. टीममध्ये दुसरा चांगला स्पिनर देखील नव्हता जो विकेट घेत होता, मॅच जिंकवून देत नव्हता,मात्र खेळवायचं नसेल, असं अमित मिश्रा म्हणाला. मला सांगितलं असतं तर इतर नऊ टीम होत्या. यावेळी लखनौकडून खेळेन की नाही सांगता येत नाही, असंही अमित मिश्रानं म्हटलं.  मला क्रिकेट खेळायचं आहे, त्यामुळं ट्रेनिंग अकॅडमीत जात नाही, असं मिश्रानं म्हटलं. 


संबंधित बातम्या :



श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज लग्नबंधनात अडकला; पहिला फोटो आला समोर