Manachi Lekhak Sanman : ‘लेखकांनी केलेला लेखकांचा सन्मान’हा मूळ हेतू साध्य करत, गेल्या पाच वर्षांतील प्रभावी लेखन करणाऱ्या लेखकांना 'मानाचि' या लेखक संघटनेद्वारे नुकतेच सन्मानित करण्यात आले. सातव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत, पार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सन्मान सोहळा अर्थात 'मानाचि लेखक सन्मान संध्या' विशेष रंगली. सातत्याने विविधांगी लेखन करणारे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांना याप्रसंगी 'मानाचि' संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे यांच्या हस्ते 'लेखन कारकीर्द गौरव' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘गेल्या ४७ वर्षांत अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलो. पण लेखक म्हणून माझी ओळख मला सर्वाधिक समाधान देणारी आहे आणि त्याकरीता देण्यात आलेला हा पुरस्कार नक्कीच प्रोत्साहनकारक आहे’, असं म्हणत पुरुषोत्तम बेर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नानाविध कार्यक्रमांनी रंगला सोहळा!
लेखकांच्या या पहिल्या वहिल्या सन्मान संध्या सोहळयात आशिष पाथरे यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमास बहार आणली. गायिका अंजली मायदेव यांच्या सुरेल आवाजातील तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने या रम्य संध्येची सुरुवात झाली, तर लेखिका उर्वी बक्षी यांनी 'मानाचि' या लेखक संघटनेच्या सात वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा समर्पक आढावा देखील यावेळी घेतला.
गप्पा-गाणी, काव्यवाचन, विनोदी प्रहसनं यांसारख्या नानाविध कार्यक्रमांनी रंगलेल्या या संध्याकाळी खासच रंगला तो 'काव्यमेळा'. गीतकार वैभव जोशी, मंदार चोळकर, समीर सामंत, लेखक राजेश देशपांडे, विजू माने, प्राजक्त देशमुख, अमोल मटकर या समस्त कवींनी सादर केलेल्या कवितांनी आणि अभिनेता समीर चौघुले आणि चेतना भट यांनी सादर केलेल्या विनोदी प्रहसनाने उपस्थितांची वाहवा आणि टाळ्या मिळवल्या. या प्रसंगी लेखकांच्या संघटनेला मोलाची मदत करणाऱ्या नामांकित चार्टर्ड अकाऊंटट मुकुंद चितळे यांचाही सत्कार करण्यात आला.
मानाचि लेखक सन्मान 2022 विजेते :
लेखन कारकीर्द गौरव : पुरुषोत्तम बेर्डे
लक्षवेधी लेखक
- उर्वी बक्षी ( शेट्ये )
- वल्लरी चवाथे
- विशाल कदम
- सरिता आगरकर
- सारिका ढेरंगे
चित्रपट लेखन
- प्रवीण तरडे
- सुनील सुकथनकर
- सुमित्रा भावे
चित्रपट गीत लेखन
- वैभव जोशी
- समीर सामंत
नाट्य लेखन
- प्राजक्त देशमुख
- समर खडस
नाट्यगीत लेखन
- प्राजक्त देशमुख
- सुजय जाधव
मालिका लेखन
- शिरीष लाटकर
- संतोष अयाचित
मालिका गीत लेखन
- मंदार चोळकर
- रोहिणी निनावे
विनोदी लेखन
- समीर चौघुले
नाट्य लेखन विशेष सन्मान
- शाम पेठकर
हेही वाचा :