Mahima Chaudhary Invites Paparazzi Her Second Wedding: 52 वर्षांची महिमा चौधरी करतेय दुसरं लग्न; जाहीरपणे दिलंय निमंत्रण, VIDEO होतोय व्हायरल
Mahima Chaudhary Invites Paparazzi Her Second Wedding: महिमाचा व्हिडीओ पाहिल्यानंतरही सर्वांना प्रश्न पडलाय की, खरंच 52 वर्षांची महिमा चौधरी दुसरं लग्न करतेय का?

Mahima Chaudhary Invites Paparazzi Her Second Wedding: बॉलिवूडची (Bollywood News) ग्लॅमरस अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhary) आजही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. नव्वदचं दशक गाजवणारी महिमा चौधरी (Actress Mahima Chaudhary) आजही अनेकांच्या काळजाची धडकन आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेली महिमा आजही तितकीच सुंदर दिसते. अशातच आता महिमा चौधरी दुसरं लग्न (Mahima Chaudhary Second Wedding) करणार आहे. हे आम्ही नाहीतर खुद्द महिमा चौधरीनं सांगितलंय. मी दुसरं लग्न करतेय, सर्वांनी माझ्या लग्नाला या, असं म्हणत महिमानं हसत हसत सर्वांना तिच्या दुसऱ्या लग्नाचं आमंत्रणंही दिलंय. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतोय. सर्वजण आश्चर्यचकीत होत आहेत. महिमाचा व्हिडीओ पाहिल्यानंतरही सर्वांना प्रश्न पडलाय की, खरंच 52 वर्षांची महिमा चौधरी दुसरं लग्न करतेय का?
गेल्या काही दिवसांपासून महिमा चौधरी दुसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. वयाच्या 52 व्या वर्षी महिमा चौधरी खरोखरच पुन्हा लग्न करतेय का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. अलिकडेच, ती एका कार्यक्रमात पॅपाराझींना भेटली आणि तिनं स्वतः सर्वांना जाहीरपणे लग्नाचं आमंत्रण दिलं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिमा कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित आहे आणि पॅपाराझींनी तिला गराडा घालून तिला प्रश्न विचारण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच ज्यावेळी पॅपाराझींनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिमा म्हणाली, "मी उद्या लग्न करतेय, माझ्या लग्नाला या सर्वांनी..." आणि गोड हसून तिथून निघून गेली.
View this post on Instagram
महिमा चौधरी दुसऱ्यांदा करतेय लग्न?
महिमा चौधरीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तर आम्ही तुम्हाला सांगतो महिमाच्या दुसऱ्या लग्ना मागचं सत्य. महिमा चौधरी लग्न करत नाहीये. ती हे सर्व तिच्या आगामी चित्रपटाच्या, 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'च्या प्रमोशनसाठी करतेय. या चित्रपटात ती संजय मिश्रा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'ची कहाणी काय?
'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' या सिनेमाची कथा एका तरुणाच्या अवतीभोवती फिरते, जो स्वतःच्या लग्नाच्या नादात आपल्या वडिलांचं दुसरं लग्न करण्याचा घाट घालतो. कारण त्याच्या सासरच्या लोकांना त्यांच्या घरात एखादी स्त्री असावी असं वाटत असतं. हे लग्न कसं घडतं आणि दुसरी आई शोधण्यात येणाऱ्या आव्हानांची कथा एका आकर्षक पद्धतीनं मांडण्यात आली आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, व्योम यादव आणि महिमा चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























