The Fame Game Trailer : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) स्टारर 'द फेम गेम'चा (The Fame Game) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 'द फेम गेम'च्या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित या स्टारडम आणि झगमगाटी विश्वामागचं गडद सत्य दाखवताना दिसत आहे. 'द फेम गेम'मध्ये माधुरी दीक्षित अनामिका आनंदची भूमिका साकारत आहे, जी व्यवसायाने अभिनेत्री आहे. यात माधुरीशिवाय संजय कपूरही दमदार भूमिकेत दिसत आहे. माधुरी दीक्षित 'द फेम गेम'मधून डिजिटल जगात पदार्पण करणार आहे.
या आधी माधुरीने घोषणा केली होती की, ‘द फेम गेम’चा ट्रेलर 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. त्याचवेळी तिने सोशल मीडियावर टीझरही शेअर केला होता, ज्यामध्ये 'अनामिका आनंद' आणि तिच्या आयुष्याची झलक दिसली. ‘अनामिका’ हे चित्रपटसृष्टीतील खूप लोकप्रिय नाव आहे. अनामिकाला तिच्या आयुष्यात खूप स्टारडम पाहायला मिळतं, पण तिला स्वतःमध्ये काहीच विशेष जाणवत नाही.
पाहा ट्रेलर :
बऱ्याच दिवसांनी माधुरी दीक्षित एका रोमांचक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीने 'आजा नचले' चित्रपटात धमाकेदार डान्स नंबर केला होता. ट्रेलरमध्येही माधुरी दीक्षित लाल रंगाचा घागरा परिधान करून, शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. ही झलक पाहून माधुरीचे नृत्य पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक झाले आहेत.
नेटफ्लिक्सच्या या सिरीजमध्ये एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात येणार आहे. माधुरी दीक्षितशिवाय अभिनेता मानव कौल, संजय कपूर, लक्षवीर सरन आणि मुस्कान जाफरी यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकारही या सिरीजमध्ये आपला दमदार अभिनय दाखवणार आहेत. ‘द फेम गेम’ ही वेब सिरीज 25 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
- Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
- Sam Fernandes : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोली विरोधात केली तक्रार दाखल
- कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha