Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद  (Sonu Sood) त्याच्या समाजिक कार्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतो. सोनू अनेक गरजू लोकांची मदत करतो. लॉकडाऊनमध्ये मुंबईत अडकलेल्या काही मजूरांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सोनूनं मदत केली होती. काही दिवसांपूर्वी सोनूनं जान्हवी शशिकांत वाबळे या 11 वर्षीय मुलीला मदत केली होती. सोनूच्या मदतीमुळे  जान्हवीने अपंगावर मात केली. त्यावेळी देखील सोनूचे अनेकांनी कौतुक केले. आता सोनूनं अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका युवकाची मदत केली आहे. 


मोगा-बठिंडा रस्त्यावर झाला होता अपघात 
मोगा-बठिंडा रस्त्यावर एक अपघात झाला. दोन कार्सची टक्कर झाली होती. रिपोर्टनुसार, एक गाडी सेंटर लॉक झाली होती. दोन तरूण गाडीमध्ये अडकले. त्याच रस्त्यावरून सोनू सूद प्रवास करत होता. त्याने रस्त्यावर झालेला हा अपघात पाहिला. त्यानंतर  सोनू सूदने गाडीचे दार उघडले आणि त्या तरूणाला गाडीमधून बाहेर काढले. सोनूनं त्या तरूणाला स्थानिक रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्या तरूणावर उपचार करण्यात आले.






सोनू सूद हा त्याच्या बिहीणीचा म्हणजेच काँग्रेस उमेदवार मालविका सूद यांच्या प्रचारामध्ये व्यस्त होता. रिपोर्टनुसार, जर सोनूनं त्या तरूणाची मदत केली नसती तर त्याच्या जीवाला धोका असला असता. सोनूचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. 


संबंधित बातम्या


Shark Tank India : बर्गर मॅगी अन् आयुर्वेदिक आईसक्रीम; शार्क टँकमध्ये मांडण्यात आलेल्या 'या' अतरंगी बिझनेस आयडिया माहितीयेत का?


Jhund : 'झुंड'ची रिलीज डेट ठरली; नागराज मंजुळेकडून पोस्ट शेअर


Kapil Sharma, Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कपिल शर्मावर नाराज? सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha