Tejasswi Prakash in Naagin 6 : बिग बॉसच्या 15 (Bigg Boss 15) व्या सीझनची विजेता तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ठरली आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये दोन खुलासे झाले आहेत. एक तर, शोला त्याचा विजेता सापडला आहे. यासोबतच एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'नागिन 6' (Naagin 6) मधील मुख्य नागिनचे नाव समोर आले आहे. 'नागिन 6' च्या मुख्य नायिकेबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र आता या नावावरून पडदा हटला आहे. तेजस्वी प्रकाश ही एकता कपूरची पुढची नागिन असेल. बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी प्रोमो झाला होता रिलीज
काही वेळापूर्वी 'नागिन 6' चा प्रोमो रिलीज झाला होता. यामध्ये नागिन कोण असणार हा सस्पेंस कायम ठेवण्यात आला होता. हा प्रोमो शेअर करताना या प्रोमोमध्ये म्हटले आहे. 'वर्ष 2019 पर्यंत जगात सर्व काही सुरळीत चालले होते. वर्ष 2020 मध्ये एका महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले होते. पण जग बदलत आहे आणि नाग बदलला आहे. नागिन लवकरच फक्त कलर्सवर. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'या बदलत्या जगाचे रंग पाहून ती परतत आहे, सर्वजण कशाची वाट पाहत आहेत, लवकरच नागिन 6.'



अनेक नावांची चर्चा झाली
'नागिन 6' च्या घोषणेनंतर अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत होती. शिवांगी खेडकरच नावही यासाठी चर्चेत होतं. पण कालांतराने तेजस्वी प्रकाश शोचा मुख्य चेहरा बनला. 'नागिन'चे आतापर्यंत 5 सीझन आले आहेत. या सीझनमध्ये अनेक सौंदर्यवतींनी नागिनीची भूमिका साकारली ज्यामध्ये मौनी रॉय, अदा खान, अनिता हसनंदानी, हिना खान, निया शर्मा आणि सुरभी चंदना यांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha