Kaali Controversy : गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शिका लीना मणिमेकलई (Leena Manimekalai) या त्यांच्या काली (Kaali) या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या पोस्टरमध्ये दाखवलेल्या दृश्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं अनेकांचा मत आहे.   लीना मणिमेकलई यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. या सर्व वादानंतर आता लीना यांनी पुन्हा एक वादग्रस्त ट्वीट शेअर केलं आहे. 


लीना यांचं नवं ट्वीट 
लीनानं आज (गुरुवार) सकाळी लीना यांनी एक ट्वीट शेअर केलं.  लीना यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शंकर आणि पार्वती यांची भूमिका साकारणारे कलाकार हे सिगारेट ओढताना दिसत आहे. 'दुसरीकडे कुठेतरी', असं कॅप्शन लीना यांनी या ट्वीटला दिलं आहे. या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी रिअॅक्शन दिल्या आहेत. 


पाहा लीनाचं ट्वीट






नेमकं प्रकरण काय?
दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या या माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे. या पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स संतापले आहेत.


'काली' डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबद्दल लीना यांनी मांडलं होतं मत
वादग्रस्त पोस्टरवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर लीना यांनी आणखी एक ट्वीट केले होते. दक्षिणात्य भाषेत असलेल्या आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. मला एक असा आवाज बनायचंय जो कधीही कुणाला घाबरणार नाही. याची किंमत जर माझा जीव असेल तरी बेहत्तर..मी तो देईन.’ या आधी त्यांनी आपल्या या चित्रपटाबाबत सांगताना लिहिले होते की, 'हा चित्रपट संध्याकाळच्या त्या घटनांभोवती फिरतो, जेव्हा तिला काली दिसते आणि ती टोरंटोच्या रस्त्यावर फिरते.’


हेही वाचा :