Leena Manimekalai Kaali Poster : सिने निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांचा 'काली' (Kaali) हा माहितीपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. या माहितीपटाच्या पोस्टरमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. नेटकरी या माहितीपटाच्या माध्यमातून 'काली'च्या पोस्टरला विरोध करत आहेत. आता ट्विटरनेदेखील 'काली' पोस्टर वादावर मोठं पाऊल उचललं आहे.
ट्विटरने हटवलं 'काली' माहितीपटाचे पोस्टर आणि पोस्ट
लीना मणिमेकलाई यांनी 2 जुलैला 'काली' या माहितीपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये मॉं कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून मॉं कालीच्या वेशभूषेत अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज पकडला होता. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. नेटकरी या पोस्टरला विरोध करताना दिसत आहेत. यावर आता ट्विटरनेदेखील अॅक्शन घेतली आहे. ट्विटरने लीना मणिमेकलाई यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन 'काली' माहितीपटाचे पोस्टर आणि पोस्ट हटवली आहे.
'काली' पोस्टर वादामुळे लीना मणिमेकलाईला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पोस्टरमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लीना मणिमेकलाईला अटक करण्यात यावी अशी मागणी नेटकरी करत आहेत. तर लीना मणिमेकलाईला यांच्या विरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आली आहे.
सिने निर्मात्या लीना यांनी 2 जुलै 2022 रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘काली’ या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरसह कॅप्शन लिहिताना त्या म्हणाल्या होत्या की, "मी खूप उत्साहित आहे कारण ‘काली’ हा माहितीपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला होता".
संबंधित बातम्या