Chaturmas 2022 : आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, जो चार महिने चालतो. यावेळी चातुर्मास 10 जुलै 2022 पासून सुरू होत आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यांत भगवान विष्णू निद्रा घेतात. या दरम्यान शुभ कार्यावर पूर्ण बंदी आहे. शास्त्रानुसार चातुर्मासातील उपासना आणि साधनेसोबत आरोग्याच्या रक्षणासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत, या चार महिन्यांत जेवणाचे काय नियम आहेत आणि जेवणात काय टाळावे? ते जाणून घेऊया. 


चातुर्मासात भोजनाचे नियम


एक वेळचं अन्न 


चातुर्मास हा व्रत आणि तपश्चर्याचा महिना मानला जातो. या चार महिन्यांत आरोग्याच्या समस्या वाढतात. चातुर्मासात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून एक वेळच अन्न घ्यावे. चातुर्मासात पचनशक्ती क्षीण झाल्यामुळे पोटाचे आजार होऊ लागतात, अशा परिस्थितीत या चार महिन्यांत अन्न पचवण्यासाठी एक वेळचे जेवण सर्वोत्तम मानले जाते.


पालेभाज्या


या चार महिन्यांत हिरव्या पालेभाज्या, कंद, वांगी खाणे टाळावे. श्रावणात पावसाळा सुरू होतो आणि वातावरणात दमटपणा वाढतो. अशा परिस्थितीत या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया असतात. त्यांचे सेवन केल्याने पोट आणि त्वचेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.


दूध, दही


निरोगी राहण्यासाठी श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही, अश्विनमध्ये दूध आणि ताक, मिठाई यांसारख्या पदार्थांचा त्याग करावा. पावसामुळे दुधात जंतू शिरण्याची शक्यता वाढते. तसेच या दरम्यान हिरवा चारा जनावरे खातात, मात्र पावसामुळे जंतू निर्माण होतात, त्याचा परिणाम त्यांच्या दुधावरही येतो.


सात्विक अन्न


चातुर्मासात सात्विक अन्नच खावे. मांसाहार, लसूण, कांदा, आले इत्यादी चार महिने टाळावेत. त्यांचे सेवन केल्याने विविध रोगांना सामोरे जावे लागू शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :