एक्स्प्लोर

Lata Mangeshkar : अलौकिक स्वर आज हरपला; शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.

Lata Mangeshkar Passes Away : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनाने अलौकिक स्वर आज हरपला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मागील 28 दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त करण्यात आला. शरद पवार यांनी ट्वीट करून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार यांनी म्हटले की, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून आदरांजली वाहिली. संजय राऊत यांनी ट्वीट करत 'युग संपले' असल्याचे म्हटले. राऊत यांनी 'तेरे बिना भी क्या जिना'...'एक सूर्य एक चंद्र... एकच लता...'असेही म्हटले आहे. 


लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.

महत्त्वाच्या बातम्या

Shrimaan Shrimati Natak: प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
प्रेमात पडणं सोपं, प्रेमासोबत जगणं शिकणं कठीण!; 'श्रीमान श्रीमती'चा पहिला प्रयोग ठाण्यात, पण कधी?
Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Zee Marathi Awards 2026: फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल
फक्त 3 तासांची झोप, तरी परफॉर्मन्स एकाच टेकमध्ये पूर्ण; झी मराठी अवॉर्ड्समध्ये खलनायकांची धमाल

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget