Lalit Modi Biopic: 1983 विश्वचषकावर आधारित 83 आणि थालावी चित्रपटांचे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता जगातील सर्वात मोठे क्रिकेट लीग फाऊंडर ललित मोदी यांच्यावर चित्रपट बनवणार असल्याची माहिती समोर आलीय. विष्णु वर्धान इंदुरी यांनी पॉपुलर स्पोर्ट्स जर्नलिस्टकडून त्याच्या पुस्तकाचे स्वामित्व हक्क विकतं घेतले केले आहेत.  फिल्म क्रिटिक्स तरण आदर्शनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या घोषणानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलंय.


तरण आदर्शनं यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, "थालावी आणि 83 चित्रपटांची निर्मिती करणारे विष्णु वर्धान इंदूरी ललीत मोदींच्या जीवनावर अधारीत पुढचा चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट स्पोर्ट्स जर्नलिस्ट बोरिया मजूनदार यांच्या 'मॅवरिक कमिश्नर: द आयपीएल-ललित मोदी सागा' पुस्तकावर आधारित आहे."  सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू आहे. जगभरातील लोकप्रिय लीगमध्ये आयपीएलचा गणना केली जाते. मोठ्या संख्येत क्रिकेट चाहते आयपीएल पाहतात. ज्यामुळं या चित्रपटाला मोठी पसंती मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 


ट्वीट-



आयपीएलची संकल्पना आणण्याचे श्रेय ललित मोदी यांना जातं., परंतु अनेक वादानंतर ललित मोदींना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर 2013 मध्ये बीसीसीआयनं त्याच्यावर कायमची बंदी घातली. सध्या ललित मोदी लंडनमध्ये राहत आहेत. मात्र, हा चित्रपट सध्या प्रथमिक अवस्थेत असून चित्रपटाशी संबंधित फारशी माहिती शेअर करण्यात आलेली नाही. ललित मोदीच्या भूमिकेसाठी निर्माते सध्या अनेक टॉप स्टार्सशी चर्चा करत आहेत. लवकरच त्याची घोषणा होऊ शकते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून इतर माहितीही लवकरच दिली जाईल.


हे देखील वाचा-