एक्स्प्लोर

'आता तुम्ही लाडात आलाय', रितेश देशमुखनं छोट्या डॉनला चांगलंच झापलं; दिला सज्जड दम, प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi Promo Goes Viral: भाऊचा धक्का एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी रितेश देशमुख प्रभू शेळकेवर चांगलेच बरसले.

Bigg Boss Marathi Promo Goes Viral: जस जसे दिवस उलटत आहेत, तस तसे मराठी बिग बॉसच्या घरात घडामोडींना वेग आला आहे.  भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्याला रितेश देशमुख सर्वांची शाळा घेतो. मागच्या आठवड्यात राधा पाटील घराबाहेर पडली होती.  नंतर भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने अनुश्रीला चांगलंच  झापलं असल्याचं पाहायला मिळालं.  राधा पाटील घरातून बाहेर पडल्यानंतर अनुश्री मानेचा चांगलाच आवाज चढला होता.  त्यामुळे रितेश देशमुखने तिची शाळा घेतली. दरम्यान,  या आठवड्यात रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रभू शेळकेला चांगलंच धारेवर धरलं. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

कलर्स मराठीने भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये रितेश देशमुख प्रभू शेळकेला झापत असल्याचं दिसून येत आहे. प्रभू शेळके अगदी निमूटपणे ऐकून घेत आहे. या आठवड्यात रितेश देशमुख प्रभू शेळकेला चांगलंच धक्का देणार असल्याचं दिसून येत आहे. रितेश प्रभूला म्हणतो, "प्रभू तुम्ही खरंतर हद्दपार केलीये.  तुम्ही स्वत: म्हणाले होतात की, मी 20 वर्षांचा आहे. मला तसंच वागवा. आता मी तुम्हाला तसेच वागवणार आहे".

"2 आठवडे तुमचं प्रचंड कौतुक झालं होतं. तुमचे खूप लाड झाले होते.  पण आता तुम्ही लाडात आले आहात. इतरांशी अगदी उद्धटपणे वागत आहात.  आता हे बस झालं", असं म्हणत छोटा डॉनला अभिनेता रितेश देशमुखने चांगलंच धारेधर धरलं. कलर्स मराठीने हा व्हिडिओ शेअर केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.  नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट करून एकंदरीत  समाधान व्यक्त केलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 एकानं, "बरं झालं भाऊ, तुम्ही बरं केलं. प्रभू काही करत नाही. फक्त टाईमपास करत असतो", अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका नेटकऱ्याने, "कुठे सूरज चव्हाण आणि कुठे हा.. हे मला पटलं आहे भाऊ.. भाऊ ऑन फायर", अशी कमेंट केली आहे.  तर, काही नेटकऱ्यांनी त्याची बाजू घेतली आहे. "उद्धटपणे?  जेव्हा त्याला कुणी काहीही बोलतं, दम देतात, सागर असो किंवा इतर, तेव्हा तुम्हाला दिसत नाही का?" अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरात एकूण 8 जणांना नॉमिनेट करण्यात आले आहे.  यापैकी एकाला आज बिग बॉसचं घर सोडावं लागेल.  सोनाली राऊत, विशाल कोटियन, दीपाली सय्यद,  प्राजक्ता शु्क्रे, प्रभू शेळके,  ओंकार राऊत,  करण सोनावणे आणि रूचिता जामदार..यांच्यापैकी कुणाला घर सोडावं लागणार? हे लवकरच उघड होईल.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget