Kubbra Sait :  सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर मतं ती सोशल मीडियावर मांडत असते. तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील कुब्रा सोशल मीडियावर शेअर करते. कुब्रानं लिहिलेल्या ओपन बुक या पुस्तकामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देण्यात आली आहे. कुब्रानं पुस्तकामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. कुब्राने पुस्तकात लिहिलं आहे की, या गोष्टीबद्दल तिनं काही वर्षांनी आपल्या आईला सांगितले.   


कुब्रानं पुस्तकामध्ये लिहिलं, ती केवळ 17 वर्षांची असताना तिच्यासोबत लैंगिक शोषण झालं होतं. बंगळुरूमधील एका हॉटेसमध्ये ती दररोज कुटुंबासह जात असे. जिथे त्या हॉटेलच्या मालकाची ओळख तिच्या कुटुंबासोबत झाली. आर्थिक संकटातही त्या हॉटेलच्या मालकानं कुब्राच्या आईची मदत केली होती.  मदत केल्यानंतर त्या व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. जेव्हा कुब्राच्या आईनं त्या व्यक्तीचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी चिंता मिटली होती.  


कुब्रानं पुस्तकामध्ये लिहिलं की, तिनं या घटनेबाबत कोणालाही माहिती दिली नव्हती. कुब्रा लाइफ इस नॉटअ फेयरीटेल नावाचे पुस्तक देखील लिहिले आहे. कुब्राला सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या सीरिजमध्ये तिनं कुकू ही भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये कुब्रासोबतच अभिनेता वाजुद्दीन सिद्दीकीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. 


हेही वाचा :