Khatron Ke Khiladi 12 : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. रोहित हा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमाचा 12 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 'खतरों के खिलाडी' कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमध्ये अभिनेत्री जन्नत जुबैर (Jannat Zubair) देखील सहभाग घेणार आहे.
जन्नत जुबेर खतरों के खिलाडीमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक?
'खतरों के खिलाडी' या शोमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींना स्टंट करावे लागतात. रिपोर्टनुसार, खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ही जन्नत जुबेर आहे. पण जन्नतनं याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही. जन्नतसोबतच रुबीना दिलैक आणि मुन्नवर फारुकी हे कलाकार देखील या कार्यक्रमाच्या 12 व्या सिझनमध्ये सहभागी होणार आहेत. जन्नतनं खतरों के खिलाडी 12 या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी 18 लाख रुपये मानधन घेतलं. जन्नतला या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे स्टंट करताना पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
जन्नतसोबतच प्रतीक सहजपाल, तुषार कालिया,चेतना पांडे, फॅसल शेख, एरिका पॅकर्ड, रुबीना दिलैक, सृती झा, मोहित मलिक यांसारखे सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनेरी वजानी ही देखील 'खतरों के खिलाडी' च्या 12 व्या सिझनमध्ये सहभाग घेणार आहे, अशी चर्चा आहे. 'अनुपमा' या मालिकेमध्ये अनेरी वजानीनं मालविका ही भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :
- PHOTO : सिल्व्हर सिक्वेंस साडीत अनन्या पांडेचा कातीलाना अंदाज! पाहा फोटो...
- Body Spray Ad : बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून सुरु झाला वाद, युट्यूब आणि ट्विटरवरून हटवण्यासाठी सरकारचा आदेश!
- Samrat Prithviraj Box Office Collection Day 2 : अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला बॉक्स ऑफिसवर मिळतेय पसंती, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत वाढ!