Body Spray Ad : एका परफ्यूम कंपनीचा जाहिरात व्हिडीओ सध्या चांगलाच वादात सापडला आहे. अनेक वेळा अशा जाहिराती केल्या जातात की, त्यावर वाद निर्माण होतो. यावेळीही असेच झाले आहे. लोक या जाहिरातीला वादग्रस्त म्हणत आहेत. ही जाहिरात लैंगिक शोषणाला प्रोत्साहन देत असल्याचे म्हटले जात आहे. महिलांवरील लैंगिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या परफ्यूम ब्रँडचे व्हिडीओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात यावेत, असा आदेश केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटरलाही जारी केला आहे.


वादग्रस्त जाहिरात लेयर शॉट या ब्रँडच्या बॉडी स्प्रेची आहे. या जाहिरातीमुळे महिलांना अपमानास्पद वाटत असल्याचे आयबी मंत्रालयाचे म्हणणे आहे. मंत्रालयाचे सहाय्यक संचालक डिजिटल मीडिया क्षितिज अग्रवाल यांनी हे ट्विट केले आहे.



नेमकं काय आहे हा जाहिरातींमध्ये?


बॉडी स्प्रे शॉटच्या पहिल्या जाहिरातीत तीन मुले एका खोलीत येतात, असे दाखवण्यात आले आहे. खोलीत एक मुलगा आधीच एका मुलीसोबत बेडवर बसला आहे. तीन मुले खोलीत आल्यावर मुलगी घाबरते. तीन मुलांपैकी एक मुलगा खोलीत उपस्थित असलेल्या मुलाला विचारतो की, शॉट मारलास का? मुलीला याचा राग येतो, मग मुलगा उत्तर देतो की, हो मारला आहे. यानंतर आता आमची पाळी आहे असे तिन्ही मुले सांगतात. आणि बॉडी स्प्रेची बॉटल घेतात.



लेयरच्या शॉट बॉडी स्प्रेच्या दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये चार मुले एका दुकानात दिसत आहेत. ते स्टोअरमध्ये परफ्यूम ठेवलेल्या ठिकाणी जातात. तिथे आधीच एक मुलगी आहे. संपूर्ण रॅकवर शॉट डीओची एकच बॉटल आहे. ते पाहून मुलं बोलतात की, आम्ही चार आहोत आणि इथे एकच आहे, मग शॉट कोण घेणार? तेवढ्यात ती मुलगी मागे वळते आणि त्यांच्या बोलण्याने घाबरलेली दिसते. मुलीच्या चेहऱ्यावरही राग दिसतो. तिला वाटते की, ते तिच्याबद्दल बोलत होते. पण, नंतर त्यांचे लक्ष शॉट डीओकडे जाते.


जाहिरात हटवण्याचे आदेश


या जाहिराती रिलीज होताच सोशल मीडियावर गदारोळ माजला. सर्वांनीच यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. बॉडी स्प्रे ब्रँड लेयर शॉटशी संबंधित दोन जाहिरातींवरून वाद झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही त्यावर आक्षेप घेतला. आता केंद्र सरकारने यूट्यूब आणि ट्विटर या दोन्ही जाहिरातींवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. 


हेही वाचा :