Markadwadi Voting : क्रांतीची 'तुतारी' फुंकत बंडाची पहिली 'मशाल' पेटवलीये..., मारकरवाडीच्या ग्रामस्थांना मराठी अभिनेत्याचा सलाम
Markadwadi Voting : सोलापूर जिल्ह्यतील मारकरवाडी हे गावं सध्या बरंच चर्चेत आलंय. या गावतील लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. त्यावर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत या गावकऱ्यांचं कौतुक केलंय.
Markadwadi Voting : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) माळशिरसमधील मारकरवाडी (Markarwadi) गावाने विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला. मारकडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलं होतं. मंगळवार 3 डिसेंबर रोजी बॅलेट मतदान घेण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. पण त्याआधीच मारकरवाडीमध्ये 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली. पण मारकरवाडीच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तसेच अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मारकरवाडीतील गावकऱ्यांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला.मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली, अशा आशायाची पोस्ट किरण माने यांनी मारकरवाडीतील गावकऱ्यांनी केली आहे.
किरण मानेंची पोस्ट नेमकी काय?
किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, 'मारकडवाडीच्या ग्रामस्थांना सलाम ! हुकूमशाही भित्री असते. बुळगी असते. फक्त तिच्यावर चाल करुन जायला असे निधड्या छातीचे, ताठ कण्याचे, सत्यवचनी बाण्याचे लोकशाहीचे खंदे सुपूत्र लागतात. भले ते हुकूमशहांच्या 'सो कॉल्ड' महाशक्तीपुढे संख्येनं कमी असतील... पण ते या शैतानाच्या टोळीला घाम फोडू शकतात.'आमच्या गांवातनं भाजपाला ऐंशी टक्के मतदान होऊच शकत नाही. इव्हीएम मशिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आहे. भलेही आमचा उमेदवार जिंकूदेत... पण आमच्या गांवातनं त्याला कमी झालेले मतदान हा आमच्या खुद्दारीवर लागलेला कलंक आहे.. आमचे गांव गद्दारी करणार नाही आणि गद्दारांना साथ देणार नाही.' ही अस्वस्थता त्यांचं मन खाऊ लागली... शेवटी सगळ्या गांवानं ठरवलं की आपल्यापुरतं बॅलेट पेपरवर मतदान घेऊया. किमान आपल्या काळजाला लागलेली टोचणी तरी थांबेल.'
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मतदानाची तारीख पक्की झाली : तीन डिसेंबर. आणि काल अचानक पाच डिसेंबरपर्यन्त मारकडवाडीवर जमावबंदीचा आदेश लादला गेला आहे. मराठा मोर्चावर झालेला लाठीचार्जासारखं बातम्यात 'प्रशासन-प्रशासन' असं म्हणायचे आदेश आले असावेत. पण प्रशासनाला कुणाचे आदेश जातात हे पब्लिकला कळतं. तरीही ग्रामस्थांनी निर्धार केलाय, "लाठीचार्ज सहन करू, गोळ्या झेलू... पण मतदान होणारच" !ही खरी छ. शिवरायांच्या आणि शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांची भुमी ! इतिहासातनं प्रेरणा घ्यायची असते ती अशी. अहो, औरंगजेब सुद्धा महाशक्ती होता.'
'जगातल्या पाच महाबलाढ्य बादशहांपैकी एक. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत त्याची सत्ता होती. शिवरायांकडचे अनेक सरदार, सरंजामदार, वतनदार ईडीला घाबरुन पळाल्यागत औरंगजेबाला सामील झाले होते. महाराष्ट्राची माती त्याला विकायची सगळी तजवीज त्या गद्दारांनी केली होती... पण अशाच लढवय्या वृत्तीच्या मुठभर मावळ्यांना सोबत घेउन छ. शिवराय आणि शंभुराजे पितापुत्रांनी औरंग्याला तब्बल अठ्ठावीस वर्ष झुंजवलं होतं. शेवटी त्याची कबर या महाराष्ट्रात खणावी लागली !मारकडवाडीकरांनी क्रांतीची तुतारी फुंकत बंडाची पहिली मशाल पेटवली आहे. त्यांच्या उद्याच्या पिढ्या अभिमानानं सांगतील की लोकशाहीची हत्या होत असताना मारकडवाडी गांवानं आपलं इमान आणि सत्त्व जागं ठेवलं होतं', अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
View this post on Instagram