Kiran Gaikwad :   झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) 'लागिरं झालं जी' (Lagir Zala Ji) या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) हा त्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे घराघरांत पोहचला. त्याचप्रमाणे देवमाणूस या मालिकेमुळेही त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असलेला किरण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे. कारण किरणने नुकतीच सोशल मीडियावर त्याच्या होम मिनिस्टरविषयी माहिती दिली आहे. 


किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. यावेळी त्याने सोशल मीडियावर वैष्णवीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना किरणने दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. वैष्णवी देखील अभिनेत्री असून झी मराठीवरील तू चाल पुढं या मालिकेतून घराघरांत पोहचली.


किरणने शेअर केले वैष्णवीसोबतचे फोटो


किरणने त्याच्या सोशल मीडियावर वैष्णवीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर किरणने म्हटलं की, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस;पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो…ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” !


किरणच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस


किरणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच त्यांच्या या नव्या प्रवासासाठी अनेक कलाकार मित्रांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वैष्णवीनेच या फोटोंवर कमेंट्स करत आहो म्हटलं आहे. धनश्री काडगांवकर, अक्षय टाकसाळे, श्वेता खरात, तेजस्विनी लोणारी, पृथ्वीक प्रताप, ऋतुराज फडके या कलाकारांनीही किरण आणि वैष्णवीचं अभिनंदन केलं आहे.  


दिग्दर्शक म्हणून पदार्पण


कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत कुतूहल आहे. त्याशिवाय "एफ.आय.आर. नंबर 469" या नावातून हे कथानक पोलीस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना अजून थोडे थांबावं लागणार आहे.  






ही बातमी वाचा : 


बेधडक नाना पाटेकर थेट बोलले अन् समोरची स्पर्धक मुलगी पडली बुचकाळ्यात, इंडियन आयडॉलमध्ये नेमकं काय घडलं?