Indian Idol 15 : मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा बेधडक स्वभाव सगळ्यांनाच माहिती आहे. ते कधी काय बोलतील, याचा कोणालाही थांबगपत्ता लागत नाही. सध्या त्यांचा वनवास हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते सध्या सगळीकडे फिरत आहेत. रिअॅलिटी शोंना तर ते आवर्जून हजेरी लावत आहेत. दरम्यान, नाना पाटेकर यांनी इंडियन आयडॉलच्या 15 व्या सिझनला हजेरी लावली आहे. या शोचा एक प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर यांच्या विधानामुळे समोरची स्पर्धक चांगलीच घाबरलेली दिसतेय. समोरची स्पर्धक घाबरल्यामुळेच सध्या नाना पाटेकर यांच्या या प्रतिक्रियेची सगळीकडे चर्चा होत आहे.
नाना पाटेकरमुळे स्पर्धक गोंधळली
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर न्यूमरोलॉजीवर बोलताना दिसत आहेत. पाटेकर यांच्या या विधानानंतर समोरची कन्टेस्टंट चांगलीच चकित जाल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे पाटेकर यांच्या या विधानामुळे सगळ्यांनाच काही काळासाठी धक्का बसला.
नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर न्यूमरोलॉजीवर बोलताना दिसतायत. इंडियन आयडॉलमधील एका स्पर्धकाला ते बोलत आहेत.तू न्यूमरोलॉजीवर विश्वास ठेवतेस का, असं त्यांनी स्पर्धक मुलीला विचारलं. त्यानंतर त्या मुलीने हो असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर नाना पाटेकर यांनी त्या मुलीला काही प्रश्न विचारले. या इंडियन आयडॉलमध्ये कोण जिंकणार? माझं वय काय आहे? असे प्रश्न विचारले. या एकाही प्रश्नाचे उत्तर मुलगी देऊ शकली नाही. त्यानंतर न्यूमरोलॉजी वगैरे सगळं थोतांड आहे. तू बिनधास्त गा. सगळी चिंता सोड, असं नाना पाटेकर या मुलीला म्हणताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
नाना पाटेकर यांच्या या प्रतिक्रियेनंतर मात्र समोरची स्पर्धक मुलगी काहीशी बुचकाळ्यात पडल्याचं दिसतंय. हाच धाका पकडत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नाना पाटेकर यांच्या प्रश्नानंतर बिचारी टेन्शनमध्ये आली आहे, असं एकाने म्हटलंय. तर इंडियन आयडॉल या कार्यक्रमात प्रमाणापेक्षा रोस्ट केलं जातंय, असं वाटत नाहीये का? असा सवाल केला आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या वनवास या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 20 डिसेंब रोजी हा चित्रपट सिनेमागृहात पाहता येणार आहे.
हेही वाचा :
'लाखों दिलोंकी धडकन' किर्ती सुरेश लग्न करणार, तारीखही आली समोर; नवरोबा आहे तरी कोण?
सौंदर्य स्पर्धेची राणी, इंटरनेटवर बोल्डनेसची चर्चा, पाकिस्तानची 'ही' ब्युटी क्विन आहे तरी कोण?