India vs Australia : भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. पुरुष संघ 5 सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहे, तर महिला संघ 5 डिसेंबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू करणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिले 2 सामने ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर स्टेडियमवर तर शेवटचा सामना पर्थ येथे होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज दुखापतग्रस्त असून तिला वनडे मालिकेत खेळणे अवघड आहे.
शुक्रवारी महिला बिग बॅश लीग (WBBL) सामन्यात ब्रिस्बेन हीटने सिडनी थंडरवर विजय मिळविल्यानंतर भारताची फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज दुखापतग्रस्त झाली. त्याच्या डाव्या मनगटाची दुखापत गंभीर झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली आहे.
ब्रिस्बेन हीटने सिडनी थंडरचा नऊ गडी राखून पराभव करून रविवारी एमसीजी येथे मेलबर्न रेनेगेड्सविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत स्थान निश्चित केले. जेमिमाने 30 चेंडूत 43 धावा केल्या ज्यानंतर ती रिटायर्ड हर्ट झाली. 134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटचे हे 10 वे षटक होते. सिडनी थंडरच्या क्षेत्ररक्षकांनी तीन वेळा जेमिमाला आऊट करण्याची संधी गमावली.
5 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका होणार सुरू
गेल्या सामन्यात चौकार वाचवताना जेमिमाला मनगटाची दुखापत झाली होती, कदाचित ही दुखापत जास्त वाढली आहे. डाव्या हाताच्या मनगटावर पट्टी बांधून ती फलंदाजी करत होती आणि काही वेळाने तिला त्रास होऊ लागला आणि ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर तिने मैदान सोडले. जॉर्जिया रेडमायनने (नाबाद 51) नाबाद अर्धशतक झळकावले, ज्यामुळे ब्रिस्बेन हीटला 28 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठता आले. जेमिमाची भारतीय महिला संघात निवड करण्यात आली आहे ज्यात संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 डिसेंबर, 8 डिसेंबर (ब्रिस्बेन) आणि 11 डिसेंबर (पर्थ) रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
हे ही वाचा -