एक्स्प्लोर

KGF Chapter 2 Teaser | धमाकेदार अॅक्शनसह बहुप्रतिक्षित 'केजीएफ 2'चा टीझर प्रदर्शित

KGF Chapter 2 Teaser 'केजीएफ' या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली कमालीची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल कायम असेल ही बाब स्पष्ट होती.

KGF Chapter 2 Teaser 'केजीएफ' या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली कमालीची लोकप्रियता पाहता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल कायम असेल ही बाब स्पष्ट होती. असंच चित्र पाहायला मिळालं आणि अखेर याच उत्साही वातावरणात या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला.

ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजेच अभिनेता यश याच्या वाढदिवसाआधीच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांमध्ये चित्रपटासाठीची असणारी उत्सुकता पाहता हा निर्णय़ घेतला गेल्याचं म्हटलं जात आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो क्षणार्थातच ट्रेंडमध्ये आला.

होमबेल युट्यूब चॅनलवर हा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये 'रॉकी' आणि त्याच्या आईचं नातं आणि गतकाळातील काही दृश्य पाहायला मिळत आहेत. रॉकीचं त्याच्या आईनं कशा प्रकारे संगोपन केलं, त्याची कशी काळजी घेतली, तो कशा पद्धतीनं मोठा झाला आणि आता आपण दिलेलं वचन तो पूर्ण करत आहे, याचीच झलक टीझरच्या काही मिनिटांच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा या चित्रपटाचा टीझर...

अभिनेत्री रवीना टंडन या चित्रपटामध्ये एक राजकीय व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. तर, संजय दत्तनं साकारलेल्या 'अधीरा'च्या लूकवरुन मात्र अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. अभिनेता यश यामध्ये धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहे. साहसदृश्य., भावभावना आणि प्रभावी संवाद यांचा मिलाप या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. यशचा एकंदर लूक आणि अंदाज पाहता चाहते त्याच्यावर खऱ्या अर्थानं भाळले आहेत. तेव्हा आता या चित्रपटाला प्रेक्षक किती पसंती देतात आणि पहिल्या भागानं रचलेले विक्रम तो मोडित काढतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Corona Update | राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण; पिंपरी- चिंचवडमध्ये दहशत

दरम्यान अद्यापही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 'केजीएफ चॅप्टर 2'मध्ये संजय दत्त, यश, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज यांसारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Embed widget