एक्स्प्लोर

Ketki Dave : पतीच्या निधनानंतर दोन दिवसांनी केतकी यांनी सुरु केलं काम; म्हणाल्या, 'मला असं वाटतं नाही की...'

केतकी दवे (Ketki Dave) यांचे पती रसिक दवे (Rasik Dave) यांचे 28 जुलै रोजी निधन झालं.

Ketki Dave : प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे (Ketki Dave) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’या मालिकेमुळे आणि ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ या चित्रपटामुळे केतकी दवे यांना विशेष लोकप्रियता मिळाली. केतकी यांच्या पतीचे म्हणजेच रसिक दवे (Rasik Dave) यांचे 28 जुलै रोजी निधन झालं. पतीच्या निधनानंतर दोन दिवसांनी केतकी यांनी शूटिंगला सुरुवात केली. एका मुलाखतीमध्ये  केतकी यांनी याबाबत सांगितलं. 

केतकी दवे म्हणाल्या की, 'सेटवर मी केतकी नाही तर एक अभिनेत्री असते. मला असं वाटतं नाही लोकांनी माझ्या दु:खात सामील व्हावं. जेव्हा मी अस्वस्थ होते. तेव्हा देखील मी काम केलं आहे. एका प्रोजेक्टमध्ये फक्त मी नाही तर पूर्ण टीम सामील असते. शो आधीपासूनच बुक केलेले असतात. मला असं वाटत की माझ्यामुळे कोणता प्रॉब्लेम होऊ नये.'
 
निधनाच्या आधी रसिक हे केतकी यांना काय म्हणाले? 
निधनाच्या आधी रसिक यांनी केतकी यांना सांगितलं होतं की, त्यांनी काम सोडू नये. केतकी यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट करत राहावे, अशी रसिक यांची इच्छा होती. 

केतकी आणि रसिक यांना रिद्धी आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत. रसिक दवे यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रसिक यांना श्रद्धांजली वाहली. रसिक यांनी  गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'पुत्र वधू' या गुजराती चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रसिक हे हिंदी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत होते.  केतकी आणि रसिक यांनी  2006 मध्ये 'नच बलिए' या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामधील या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

 वाचा सविस्तर बातमी: 

Rasik Dave: अभिनेते रसिक दवे यांचे निधन; वयाच्या 65 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Salman Khan Treatment: 'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
'स्वत:च्या डोक्यावर इंजेक्शन...', सलमान खाननं घेतलीय 'ती' ट्रिटमेंट, जवळचा मित्र म्हणाला, 'तो बिर्याणी खात...'
Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget